शिवशंकर तिवारी, प्रतिनिधी, दहीसर
ADVERTISEMENT
मुंबईतल्या दहीसर भागात असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास चोरट्यांनी गोळीबार केला. यामध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर बँकेच्या शाखेचा सुरक्षा रक्षक जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मास्क घातलेले दोनजण बँकेत आले. त्यांनी बँकेत असलेले कर्मचारी संदेश गोमरे यांच्याकडून रोख रक्कम असलेली बॅग हिसकाण्यास सुरूवात केली.
संदेश गोमरेने चोरट्यांना विरोध दर्शवला. त्यावेळी या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि तिथून फरार झाले. पैशांची बॅग लुटण्याआधी संदेश गोमरेवर त्यांनी गोळीबार केला होता. ही गोळी संदेश यांच्या छातीत लागली आणि त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे चोरटे पायी आले होते. संदेशकडे असलेली अडीच लाखांची रक्कम घेऊन चोरटे पळाले. या घटनेत संदेश यांचा मृत्यू झाला आहे तर एक सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी या कर्मचाऱ्याच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं आहे. या प्रकरणी चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांची आठ पथकं तयार करण्यात आली आहेत. जी या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 2 संशयित इसमांनी बँकेतील अडीच लाख रुपये कॅश घेऊन आणि फायरिंग करून मोटरसायकलवर पळ काढला. गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले?
‘अत्यंत धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. मंगळवारी मी कायदा सुव्यस्थेवर अंतिम आठवडा प्रस्ताव आणला होता. अशात दहीसरमध्ये हा दरोडा टाकला गेला. अशा प्रकारे बँक लुटण्यासाठी गोळीबार होत असेल तर कसे जगायचे? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच ग्राहकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? याला राज्य सरकार जबाबदार आहे. गुन्हेगाराचा धीर चेपला तर अराजकता माजेल. मी त्याठिकाणच्या डिसीपी यांच्यासोबत बोललो. त्यांना चौकशी करण्यास सांगितलं आहे’, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT