भामरागडच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. जंगलात पोलिसांची शोध मोहीम सुरू असतानाच 60 नक्षल्यांच्या गटाने पोलिसांवर अचानक हल्ला करत अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी पोलीस जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका नक्षलवाद्याचा खात्मा केला. या नक्षलवाद्याची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र -छत्तीसगड सीमेवर सध्या महामार्ग व पुलाचे बांधकाम करू नका, अशी मागणी स्थानिक स्थानिक आदिवासींकडून केली जात आहे. याविरोधात आदिवासींचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला नक्षलवाद्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
आंदोलन उग्र करण्यासाठी नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट
दरम्यान, हे आंदोलन अधिक उग्र करण्यासाठी नक्षल्यांनी मोठा घातपात आखला होता. याची माहिती मिळताच जांबिया-गट्टा परिसरातील हिकेर जंगलात पोलिसांनी मोठे शोध अभियान हाती घेतले होते.
हेही वाचा – कोळसा खाणीतला कामगार ते नक्षली चळवळीतला म्होरक्या, जाणून घ्या कोण आहे मिलींद तेलतुंबडे?
शनिवारी (1 एप्रिल) सकाळी या जंगलातील टेकड्यांवर नक्षलविरोधी अभियान पथक आणि नक्षली आमने-सामने आले. 60 जणांच्या नक्षलवाद्यांच्या गटाने अचानक पोलिसांवर अंदाधूंद गोळीबार सुरू केला. नक्षल्यांना पोलिसांकडून प्रत्यत्तर देण्यात आले. दोन्ही बाजूंनी जवळपास सुमारे पाऊण तास ही चकमक चालली.
हेही वाचा – अक्कू यादव प्रकरणात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेच्या नावाची चर्चा? नेमकं काय आहे प्रकरण
त्यानंतर नक्षली पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळाची झाडाझडती घेतली. घटनास्थळांच्या शोध मोहिमेत पोलिसांना एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. भामरागड तालुक्यातील समीर लिंगा मोहदा असे या नक्षलवाद्याचे नाव असून, त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते. तो सध्या कंपनी क्रमांक 10 मध्ये कार्यरत होता.
घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त
घटनास्थळाच्या शोध मोहिमेत पोलिसांना एक देशी रायफल, एक भरमार बंदूक, एक थ्री नॉट थ्री रायफल, जिवंत काडतुसे, नक्षल लेखी साहित्य व याशिवाय एक टॅबलेट आढळून आला असून, यातून नक्षलवाद्यांचे वेगवेगळे मनसुबे कळण्यास पोलिसांना मदत होणार आहे. पोलिसांनी 38 हजार रुपयांची रोख रक्कम देखील चकमक स्थळावरून ताब्यात घेतली आहे.
ADVERTISEMENT