Mumbai Rape Case: इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, एकाच रात्री 3 ठिकाणी अल्पवयीन मुलीवर गँगरेप

सौरभ वक्तानिया

• 05:22 PM • 06 Jun 2021

मुंबई: मुंबईत (Mumbai) एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) आणि सामूहिक बलात्काराचे (Gang Rape) प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि आरोपी इंस्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून मित्र होते. सध्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोघांचा शोध सुरू आहे. मुंबईत एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच रात्रीत तीन […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मुंबईत (Mumbai) एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) आणि सामूहिक बलात्काराचे (Gang Rape) प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि आरोपी इंस्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून मित्र होते. सध्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोघांचा शोध सुरू आहे.

हे वाचलं का?

मुंबईत एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून तर दोन आरोपींचा शोध अद्यापही सुरू आहे.

आक्षेपार्ह Video व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकरासह 5 जणांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 31 मे आणि 1 जून दरम्यान मध्यरात्री घडली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार मालाड पोलीस स्थानकात नोंदविल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिचा शोध सुरु केला होता. मुलगी अल्पवयीन असल्याने तिचं अपहरण तर झालेलं नाही या दृष्टीने सुरुवातीला तपास सुरु केला होता.

दरम्यान, दुसर्‍या दिवशी दुपारी मुलगी स्वतःच घरी परतली. जेव्हा ती घरी परतली तेव्हा ती खूपच घाबरलेली होती. जेव्हा तिच्या पालकांनी तिला विचारले ती कुठे होती आणि नेमकं काय करत होती. तेव्हा तिने काहीही सांगितलं नाही.

पण यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांचीा एक टीम मुलीच्या घरी पोहोचली. सुरुवातीला मुलगी त्यांनाही काहीच सांगत नव्हती, परंतु थोड्या वेळाने तिने जे काही पोलिसांना सांगितलं ते ऐकून सर्वांना एकच धक्का बसला.

पुण्यात अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार, गोळी झाडून ठार करण्याचाही प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे इंस्टाग्रामवर काही मित्र होते आणि त्यातील एकाने वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. यावेळी सर्वजण मढ परिसरातील हॉटेलबाहेर भेटले आणि त्यांनी वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी कारवरच केक कापला.

दुसरीकडे इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या दोन मित्रांनी मुलीला कारमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्यांनी मुलीला मालाड परिसरातील दुसर्‍या मित्राच्या घरी सोडलं. इथेही तिच्यावर मित्राने बलात्कार केला. यानंतर मुलगी तिच्या घरी न जाता दुसर्‍या मित्राच्या घरी गेली. जिथे तिच्यावर पुन्हा एकदा बलात्कार करण्यात आला.

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांचे वय 18 ते 23 दरम्यान आहे. पोलिसांनी अशीही माहिती दिली आहे की, या सर्वांची इंस्टाग्रामवरच एकमेकांशी ओळख झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी दोन आरोपींचा शोध सध्या सुरु आहे. ज्या दोन आरोपींचा शोध सुरु आहे त्यांनी बलात्कार केलेला नाही. मात्र, गुन्हा घडत असताना ते दोघेही तिथेच उपस्थित होते.

Rape Case : अभिनेता पर्ल पुरीला जामीन नाही, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सर्व आरोपींना पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये अटक करण्यात आली आहे. या सर्वांना आरोपींना कोर्टात हजरही करण्यात आलं होतं. सध्या हे सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून या संपूर्ण प्रकरणी पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.

    follow whatsapp