राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून झालेला हल्ला सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेविरुद्ध राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार निदर्शनं केली. परंतू ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोडेमारो आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगलेली पहायला मिळाली.
ADVERTISEMENT
या जोडेमारो आंदोलनाला शहरातल्या हातावर मोजता येतील इतक्या कार्यकर्त्यांची हजेरी होती. दोन महिला कार्यकर्त्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते, भाजप नेते सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडाळकर, माजी खासदार किरीट सोमय्या यांचे फोटो असलेलं बॅनर हातात पकडलं आणि उर्वरीत चार पुरुष कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोला जोडे मारले.
अशा प्रकारे अवध्या काही मिनीटांतच राष्ट्रवादीच्या जोडेमारो आंदोलनाची सांगता झाली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या कार्यकर्त्यांनी आपल्या जोडेमारो आंदोलनादरम्यान पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली. परंतू या आंदोलनामुळे तीन ते चार गटांमध्ये विभागल्या गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे
ADVERTISEMENT