Ajit Pawar: नागपूर:Ajit Pawar: नागपूर: विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे उद्यापासून (19 डिसेंबर) सुरु होणार आहे. त्याआधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचं स्पष्ट केलं. याचवेळी पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर देखील बोचरी टीका केली. (opposition leader ajit pawar lashed out to devendra fadnavis over govt formation)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस हेच 2024 ला मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. याचबाबत जेव्हा अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांवरच बोचरी टीका केली आहे.
पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:
‘नाकाखालनं आमचं सरकार काढलं तर आम्ही काय तिथे नाक खुपसायला जात नाही’
‘आता त्यांनी नाकाचा वैगरे उल्लेख करावा हे दुर्दैवच आहे. प्रत्येकाची नाकं वैगरे तपासावी लागतील. त्याच्या खोलात मला जायचं नाही. वास्तविक हेच एकेकाळी म्हणायचे की, एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय हा अंतर्गत आहे. आमचा काही संबंध नाही. नंतर तेच म्हणायला लागले की, आम्ही बदला घेतला, आम्ही फोन केले… मी पाठवलं याला. मी पाठवलं त्याला..’
‘ज्या दिवशी आघाडीचं सरकार आलं त्या दिवसापासून यांना वेदना होत होत्या. ते त्या दिवसापासून कामाला लागले होते. ठीक आहे ते आता जगजाहीर झालं आहे. आता सरकार नाकाखालनं घेतलं की, आणखी कशा खालनं घेतलं हा संशोधनाचा भाग आहे.’
हिवाळी अधिवेशन: ‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं भित्रं सरकार पाहिलेलं नाही’, फडणवीसांची तुफान टोलेबाजी
‘फडणवीस वेशभूषा बदलून-बदलून जायचे. आता काय वेशभूषा कसली-कसली करायचे माहित नाही.’
‘आता मुख्यमंत्री कोणाला व्हायचं हे त्यांनी ठरवावं. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्या दोघांमध्ये नाक खुपसायचा काही कारण नाही. यांनी नाकाखालनं आमचं सरकार काढलं तर आम्ही काय तिथे नाक खुपसायला जात नाही.’ असं म्हणत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना अनेक चिमटे यावेळी काढले. त्यामुळे आता उद्यापासून विधानसभेत देखील या दोन नेत्यांमधील जुगलबंदी ही आपल्याला पाहायला मिळणार आहे.
‘मी काही ज्योतिषीकडे जात नाही’, एकनाथ शिंदेंना टोला
दरम्यान, 2024 रोजी कोण मुख्यमंत्री होईल या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ‘आता 2022 सुरु आहे आपण 2024 बद्दल प्रश्न विचारतायेत. आम्ही आताच काल हल्लाबोल मोर्चा काढला. आमचा प्रयत्न आहे की, आमची एकजूट टिकवण्याचा. पण आम्ही काही ज्योतिषी नाही 2024 ला काय होईल ते सांगायला.’
‘आम्ही ज्योतिषाकडे जाऊन पाहणी पण करत नाही. की, काय आमचं ज्योतिष सांगतंय. मंगळ काय सांगतोय, गुरु काय सांगतोय.’ असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता लगावला.
नागपूरमधे १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन, सरकारची घोषणा
‘नाकाखालनं सरकार काढलं आणि मग…’
‘मुंबई-गोवा हायवेची तर शोकांतिका आहे. गेली अनेक वर्ष कार्यक्रम चाललाच आहे पण तो काही पूर्ण होतच नाहीए. वास्तविक गडकरींना अनेक मान्यवर भेटले. आमची पण इच्छा आहे की, तेथील रस्ता चांगला व्हावा. कारण तेथील लोकांची अवस्था येता-जाताना काय होते ते आपण सगळे जण पाहतोच आहे. माझं तर मत आहे की, त्यात एकटं केंद्र सरकार हे फोर लेन करायला कमी पडत असेल तर ते फोर लेन करण्याऐवजी सिक्स लेन करावा. वरचे एक-एक लेन राज्य सरकारने वाढवाव्यात. पण तो प्रकल्प पूर्णत्वाला न्यावा.’
‘खरं तर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन 1 मे रोजी करायचं असं ठरलेलं. कारण 1 मे महाराष्ट्र दिन असतो. पण अचानक तिथे एक ब्रीज नादुरुस्त झाला आणि त्यामुळे तो सोहळा पुढे गेला. त्यानंतर नाकाखालनं सरकार काढलं आणि मग यांचं सरकार आलं आणि त्यांनी उद्घाटन केलं.’ अशी टिप्पणीही अजित पवार यांनी यावेळी केली आहे.
चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार
दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सत्ताधारी नेत्यांकडून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य, सीमाप्रश्न या सगळ्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला असल्याचंही अजित पवारांनी जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT