एकीकडे देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. अनेक राज्यांत वैद्यकीय सुविधेवर ताण येत असून ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि अन्य वैद्यकी उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. अशा खडतर काळात केंद्र सरकार देशभरात लॉकडाउन लावेल का असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या मनात होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही देशभरात लॉकडाउन लावला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत.
ADVERTISEMENT
भारतात Corona ची तिसरी लाट कधी येणार ? जाणून घ्या तज्ज्ञांनी काय दिलं आहे उत्तर
बुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत निती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी देशभरात लॉकडाउन लावण्याच्या पर्यायावर विचार सुरु असल्याचं सांगितलं आहे. आतापर्यंत अनेक वैद्यकीय तज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिला आहे. ज्या राज्यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त आयसीयू बेड्स रुग्णांनी भरले आहेत आणि जिकडे Test Positivity rate १० टक्क्यांवर आहे अशा भागात आम्ही स्थानिक यंत्रणांना नाइट कर्फ्यूसह निर्बंध लादण्याची मूभा दिली आहे अशी माहिती पॉल यांनी दिली. केंद्र सरकारचे नियम हे स्पष्ट आहेत. सध्याच्या निर्बंधाच्या जोडीला जर आणखी काही उपाययोजनांची गरज लागली तर त्या पर्यायांचा विचार करुन निर्णय घेतला जाईल असं म्हणत पॉल यांनी देशभरात लॉकडाउन लावण्याबाबत संकेत दिले.
देशातील आरोग्यव्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेता अनेक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी केंद्र सरकारला लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिला होता. सध्याच्या घडीला कोरोना विषाणूची साखळी मोडायची असेल तर लॉकडाउन हा एकच पर्याय असल्याचं मत अनेक राजकीय नेत्यांनीही व्यक्त केलं आहे. सध्या देशात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळणाऱ्या पहिल्या ५ राज्यांत महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकार लॉकडाउनच्या पर्यायाचा विचार करेल का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ऑक्सिजनवरुन राजकारण : कर्नाटकने महाराष्ट्राचा ५० टन ऑक्सिजन साठा रोखला – सतेज पाटील
ADVERTISEMENT