ADVERTISEMENT
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग वाढला असून, सरकारने गर्दी होणार नाही यासाठी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचं दिसत आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरमध्ये सय्यद अहमद कबीर उर्फ दादा हयात कलंदर यांचा संदल काढण्यात आला. या उत्सवात हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती.
संदल कार्यक्रमाची पुर्व सूचना मंगरुळपीर पोलिसांना असतानाही संदल उत्सव भरलाच कसा, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे संदल निमित्ताने उसळलेल्या गर्दीमुळे कोरोना वाढणार नाही का? असा सवालही स्थानिक करत आहे.
ADVERTISEMENT