गुजरातच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या १६ मच्छिमारांना पाकिस्तानने घेतलं ताब्यात, सातजण पालघरचे

मुंबई तक

• 06:06 PM • 30 Sep 2022

मोहम्मद हुसैन खान, प्रतिनिधी, पालघर गुजरातच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या १६ मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गुजरात मधल्या ओखा या ठिकाणी मत्स्यगंधा आणि त्यासोबत आणखी एक बोट मासेमारीसाठी गेली होती. या दोन्ही बोटी मच्छीमार बोट होत्या. ज्या १६ जणांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं आहे त्यातले सात जण पालघर जिल्ह्यातले आहेत. पाकिस्तानच्या मेरिटटाईम सिक्युरिटी एजन्सीने […]

Mumbaitak
follow google news

मोहम्मद हुसैन खान, प्रतिनिधी, पालघर

हे वाचलं का?

गुजरातच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या १६ मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गुजरात मधल्या ओखा या ठिकाणी मत्स्यगंधा आणि त्यासोबत आणखी एक बोट मासेमारीसाठी गेली होती. या दोन्ही बोटी मच्छीमार बोट होत्या. ज्या १६ जणांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं आहे त्यातले सात जण पालघर जिल्ह्यातले आहेत. पाकिस्तानच्या मेरिटटाईम सिक्युरिटी एजन्सीने या सगळ्यांना ताब्यात घेतलं आहे. पाकिस्तान–इंडिया पीपल्स फॉर्म फॉर पीस अँड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

काय घडली घटना?

गुजरात राज्यातून समुद्रात मासेमारी साठी गेलेल्या दोन बोटींना पाकिस्तानच्या मेरिट टाईम सिक्युरिटी एजन्सीने ताब्यात घेतले असून त्यातील अटक केलेल्या एकूण १६ खलाशी कामगारा पैकी ७ खलाशी हे पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील असल्याची माहिती पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी दिली.

२३ सप्टेंबरला मासेमारीसाठी निघाल्या होत्या बोटी

गुजरात राज्यातील ओखा येथील मत्स्यगंधा आणि अन्य एक मच्छीमार बोट २३ सप्टेंबर रोजी आपल्या बंदरातून मासेमारीसाठी नेहमी प्रमाणे समुद्रात गेल्या होत्या. या दोन्ही बोटी मत्स्यसाठ्यांचा शोध घेत असताना समुद्रात प्रवाहात सोडलेली जाळी आपल्या बोटीत घेत असताना अचानक पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीच्या स्पीड बोटीनी भारतीय मच्छीमार बोटींना घेराव घातला.आणि त्या दोन्ही बोटींसह १६ खलाश्याना पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतले. या दोन्ही बोटीत असलेल्या खलाश्यांपैकी ७खलाशी हे पालघर जिल्ह्यातील असून अन्य ९ खलाशी हे गुजरात राज्यातील आहेत.

    follow whatsapp