बीड : नगरपंचायत निवडणुकीत पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना धोबीपछाड

मुंबई तक

• 12:04 PM • 19 Jan 2022

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज्यातील भाजपच्या महत्वाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार पुनरागमन केलं आहे. बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आपले भाऊ धनंजय मुंडे यांना धोबीपछाड देत ३ नगरपंचायतींवर भाजपची सत्ता आणून दाखवली आहे. आष्टी, पाटोदा, शिरुर या तीन नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता आली असून वडवणीची नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. केजमध्ये स्थानिक […]

Mumbaitak
follow google news

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज्यातील भाजपच्या महत्वाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार पुनरागमन केलं आहे. बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आपले भाऊ धनंजय मुंडे यांना धोबीपछाड देत ३ नगरपंचायतींवर भाजपची सत्ता आणून दाखवली आहे.

हे वाचलं का?

आष्टी, पाटोदा, शिरुर या तीन नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता आली असून वडवणीची नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. केजमध्ये स्थानिक जनविकास आघाडीने वर्चस्व मिळाल्याचं पहायला मिळतंय.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भावा-बहिणीमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच नगरपंचायत निवडणुकीसाठी सक्रीय झाल्या होत्या. पाच पैकी केवळ एकच नगरपंचायत राष्ट्रवादीच्या खात्यात गेल्यामुळे पंकजा मुंडेंचं बीड जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित राहिल्याचं पहायला मिळत आहे.

एका जागेने केला घोळ, कुडाळमध्ये राणेंचं वर्चस्व धोक्यात ! सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्या हातात

1) केज नगरपंचायत

एकूण जागा -17

जनविकास आघाडी – 8

राष्ट्रवादी – 5

काँग्रेस – 3

अपक्ष – 1

———————————————————–

2) शिरूर कासार नगरपंचायत

एकूण जागा -17

भाजपा- 11

राष्ट्रवादी काँग्रेस- 04

शिवसेना- 02

————————————————————

3) आष्टी नगरपंचायत

एकूण जागा -17

भाजपा-9

राष्ट्रवादी काँग्रेस-02

काँग्रेस-01

अपक्ष- 04

4) वडवणी नगरपंचायत

एकूण सदस्य 17

भाजप – 08

राष्ट्रवादी- 09

————————————————————-

5) पाटोदा नगरपंचायत

एकूण जागा-17

भाजप- 09

भाजप पुरस्कृत- 06

महाविकास आघाडी – 02

या विजयानंतर पंकजा मुंडे यांनी, नगरपंचायत चुनाव एक झांकी है, जि.प.,पं.स. अभी बाकी है असं सांगत इथून पुढंच्या काळात भाजपला आणखीन मोठं यश मिळेल अशी प्रतिक्रीया दिली आहे. नगरपंचायतीचा निकाल लोकांचा जनादेश असून हा विजय संपूर्णपणे जिल्हयातील जनतेचा आहे, त्याबद्दल सर्व जनता आणि परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानते अशी प्रतिक्रिया पंकजाताई मुंडे यांनी दिली. प्रत्येक निवडणूक पुढच्या निवडणुकीची पायाभरणीच असते. भविष्यातील निवडणूकीची काय दिशा असेल हे या निकालाने स्पष्ट झाले आहे.

गेल्या अडीच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचा जिल्हयातील जनतेत असलेला मोठा रोष आणि आम्ही केलेली विकास कामे यामुळे जनतेनी आम्हाला पसंती दिली. सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला असं पंकजाताई म्हणाल्या. ओबीसी आरक्षणाच्या निकालापूर्वी निवडणूका घेणं योग्य नव्हतं असंही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.

विधानसभा, जिल्हा बँक आणि नगरपंचायत, साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या पराभवाची हॅटट्रीक

    follow whatsapp