लॉकडाउनमुळे काम बंद, पैश्यांसाठी हॉटेलचे कुक बनले मोबाईल चोर

मुंबई तक

• 03:02 PM • 30 Apr 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनची घोषणा केली आहे. या लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्या अनेक जणांवर पुन्हा एकदा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. लॉकडाउमुळे केरळमधील हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या तिघा मित्रांचं काम बंद झालं. पैशांची चणचण दूर करण्यासाठी त्यांनी मोबाईल चोरून मुंबईत विकण्याचा प्लान आखला…परंतू रेल्वे पोलिसांच्या शिताफानीने तिन्ही आरोपींना अटक […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनची घोषणा केली आहे. या लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्या अनेक जणांवर पुन्हा एकदा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. लॉकडाउमुळे केरळमधील हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या तिघा मित्रांचं काम बंद झालं. पैशांची चणचण दूर करण्यासाठी त्यांनी मोबाईल चोरून मुंबईत विकण्याचा प्लान आखला…परंतू रेल्वे पोलिसांच्या शिताफानीने तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

हे वाचलं का?

अटकेत असलेले तिन्ही आरोपी हे मुळचे दिल्लीचे असल्याचं कळतंय. लॉकडाउन काळात तिघांची ओळख झाली होती. या काळात तिघांनाही केरळमधील एका हॉटेलमध्ये कुकची नोकरी मिळाली होती. काही काळ केरळमध्ये काम केल्यानंतर दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा केली, आणि तिन्ही मित्रांचं काम बंद झालं. अखेरीस पैशाची चणचण दूर करण्यासाठी तिघांनीही हॉटेलजवळील मोबाईल दुकानात चोरी करण्याचं ठरवलं. चोरी करुन झाल्यानंतर हे मोबाईल मुंबईत विकण्याचा तिघांना बेत होता.

नीठरलेल्या प्लानप्रमाणे तिन्ही आरोपीं मोबाईलची चोरी करुन तीन वेगवेगळ्या बॅगमध्ये हा माल ठेवत मुंबईच्या दिशेने कूच केलं. केरळमध्ये पोलिसांनी या चोरीबद्दल गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. तपासात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तिघा कुकवर संशयाची सुई येऊन थांबली. हे तिन्ही आरोपी रेल्वेने केरळ सोडून गेल्याचं कळताच केरळ पोलिसांनी पनवेल रेल्वे पोलिसांना याबद्दल माहिती दिली. तिन्ही आरोपी प्रवास करत असलेली गाडी पनवेल स्थानकात येताच रेल्वे पोलिसांनी या आरोपींना मुद्देमालासह अटक केली असून सर्व चोरीचा माल ताब्यात घेतला आहे.

    follow whatsapp