मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचं प्रकरण असो किंवा मनसुख हिरेन यांचं हत्या प्रकरण असो या दोन्ही प्रकरणात त्यावेळचे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची आणि API सचिन वाझे या दोघांची भूमिका संशयास्पद होती. त्यामुळे मी त्यावेळी परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली केली असं आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची भूमिका अतिशय संशयास्पद होती, तसंच अतिशय गंभीर चुका त्यांनी केल्या ज्या माफ करण्यासारख्या नव्हत्या म्हणून मी त्यांची तातडीने बदली केली होती.
ADVERTISEMENT
CBI चौकशीचे साडेदहा तास आणि अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया
एका जाहीर कार्यक्रमातही मी परमबीर सिंग यांना सांगितलं होतं की तुमच्या हातून गंभीर चुका झाल्या आहेत. अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद होती त्यामुळे मी त्यांना त्यावेळी पदावरून हटवलं. त्याच रागातून परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केले होते. जेव्हा ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते तेव्हा त्यांनी आरोप केले नाहीत. त्यांच्याकडून तपास काढून घेतल्यानंतर आणि तो एटीएसकडे दिल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले.
मागील तीस वर्षांच्या राजकीय जीवनात एकही आरोप माझ्यावर झालेला नाही. त्यामुळे या संपूर्ण बाबतीत न्याय मिळावा म्हणून मी उच्च न्यायालयात माझी याचिका दाखल केली असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
सचिन वाझे ते परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत का?
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती. या प्रकरणी एटीएसने सचिन वाझेंना अटक केली. ही कार ज्या मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती त्यांचीही हत्या झाली. या प्रकरणात त्यावेळी गृहमंत्री पदी असलेल्या अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची बदली केली होती. यानंतर लेटर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यामध्ये गंभीर आरोप केले. गृहमंत्रीपदी असलेल्या अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना 100 कोटी रूपये वसुलीचं टार्गेट दिलं होतं. तसंच अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदी असताना पदाचा दुरपयोग केला आणि बदल्यांमध्येही ते ढवळाढवळ करत होते असाही आरोप केला होता.
महाराष्ट्र सरकार हात धुवून मागे लागल्याचं म्हणत परमबीर सिंग यांची पुन्हा कोर्टात धाव
या प्रकरणी सुरूवातीला अनिल देशमुख यांचा राष्ट्रवादीने बचाव केला. शरद पवार यांनी दोनवेळा पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हटलं होतं. मात्र हे प्रकरण जेव्हा आधी सुप्रीम कोर्टात आणि नंतर हायकोर्टात गेलं. हायकोर्टाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. तसंच परमबीर सिंग यांनी पदाचा गैरवापर केला आणि अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांची भूमिका संशयास्पद होती असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT