-दिलीप माने, परभणी
ADVERTISEMENT
Wife Murder : परभणी: एका पतीने आपल्याच पत्नीचं शिर कोयत्याने धडावेगळं करुन निर्घृण हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना परभणीतील (Parbhani) कमलापूर (ता. पूर्णा) येथे घडली आहे. नराधम पती एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने चक्क पत्नीचं धडावेगळं केलेलं शिर हातात घेऊन संपूर्ण गावाला दाखवलं. अत्यंत क्रूर पद्धतीने केलेल्या हत्येमुळे अवघा परभणी जिल्हा हादरुन गेला आहे. (parbhani crime wifes head was cut off the killer husband walked around the village with his head in his hand)
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पती केशव मोरे (वय 43 वर्ष) याने कोयत्याने स्वत:च्याच पत्नीचा चेहरा विद्रूप करुन तिचं शिर धडावेगळे केल्याची धक्कादायक घटना मंगळवार (29 नोव्हेंबर) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.
या भयंकर घटनेमुळे कमलापुर व परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, पतीने पत्नीची एवढ्या निर्घृणपणे हत्या का केली याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे हत्येचं नेमकं कारण काय याचा शोध घेण्याचं आवाहन पोलिसांसमोर असणार आहे.
Shraddha Murder Case : “श्रद्धाचं फ्रीजमध्ये ठेवलेलं शीर दररोज पाहायचो” ऐकून पोलिसही हादरले
घटना घडल्यानंतर सुमारे अर्धा तास आरोपी एका हातात पत्नीचे मुंडके व एका हातात धारधार कोयता घेऊन घराच्या समोर फिरत होता. यामुळे कुंटुबातील परिवारामधील नातेवाईकांसह गावातही भीतीचं वातावरण पसरलं होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमलापूर येथील केशव गोविंदराव मोरे व त्यांची पत्नी आशाबाई केशवराव मोरे (वय 37 वर्ष) यांचा सुखी संसार होता. त्यांना एक मुलगा आणि 2 मुली असा परिवार होता.
मंगळवार रात्री घरातील सर्वजण झोपलेले असताना अचानक रात्री 9 वाजेच्या सुमारास केशव मोरे याने हातात धारधार कोयता हातात घेऊन थेट पत्नी आशाबाई मोरेच्या चेहऱ्यावर भीषण वार करून तिचा संपूर्ण चेहराच विद्रुप केला. नराघम केशवचा राग एवढ्यावरच शांत झाला नाही. पत्नीचा चेहरा विद्रूप केल्यानंतर केशवने हातातील कोयत्याने तिचं शिरच धडावेगळं करुन टाकलं.
तिसऱ्या नवऱ्याचे केले 10 तुकडे, फ्रिजमध्ये ठेवून एक-एक फेकले, श्रद्धा वालकरप्रमाणेच केली हत्या
यानंतर आरोपी केशव हा एका हातात धारधार कोयता आणि दुसऱ्या हातात पत्नीचे मुंडके घेऊन घरासमोर फिरत बसला. केशवच्या हातात कोयता असल्याने गावातील कोणीही त्याच्याजवळ जाण्यास धजावत नव्हतं. अखेर या घटनेची माहिती ताडकळस पोलीस ठाण्याचे विजय रामोड यांना मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी संभाजी शिंदे, चाटे, काळे, दिपक बेंडे, चव्हाण यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि शिताफिने आरोपीला ताब्यात घेतले.
दुसरीकडे आशाबाई मोरे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन परभणी येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन पाठविण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT