लाइव्ह
Maharashtra Breaking News Live : ED च्या साडे आठ तासाच्या चौकशी नंतर रोहित पवार बाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोष
मुंबई तक
01 Feb 2024 (अपडेटेड: 02 Feb 2024, 03:33 AM)
Budget 2024 parliament session live : अर्थमंत्री निर्मला सितारमण आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प सादर करायला सुरूवात करणार आहेत. या बजेटमध्ये लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. या बजेटसह राज्यभरातील राजकीय आणि इतर घडामोडींसाठी मुंबई तक लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 09:44 PM • 01 Feb 2024बारामती अॅग्रोच्या कागदपत्रांची 8 फेब्रुवारीला पुन्हा तपासणी- रोहित पवारांची माहितीबारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून रोहित पवारांची सुरु असलेली चौकशी अजून पूर्ण झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा 8 तारखेला चौकशीसाठी ईडीतर्फे कागदोपत्रांची तपासणी करण्यात येणार असल्याचेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले. 8 तारखेला त्यांनी पुन्हा चौकशीसाठी बोलवलं असलं तरी आता रोहित पवारांनी हजर राहण्याची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी व्यक्त केली.
- 09:13 PM • 01 Feb 2024ED च्या साडे आठ तासाच्या चौकशी नंतर रोहित पवार बाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोषबारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवारांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी करण्यात आली. ही चौकशी साडेआठ तास चौकशी करण्यात आली आहे. 24 जानेवारी रोजी 11 तास चौकशी केली होती, तर आज साडे आठ तास चौकशी केल्यानंतर ते बाहेर आले आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले.
- 06:08 PM • 01 Feb 2024नारायण राणे लोकसभा निवडणूक जिंकणारmumbaitak
- 12:04 PM • 01 Feb 2024Budget 2024 parliament session live : टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही - अर्थमंत्रीटॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या आयकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही. आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. परतावा देखील त्वरीत जारी केला जातो. जीएसटी संकलन दुप्पटीने वाढले आहे. जीएसटीने अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे, असे निर्मला सीतारामण यांनी सांगितले आहे.
- 12:01 PM • 01 Feb 2024Budget 2024 parliament session live : तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जाणारतीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील. पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाईल. पंतप्रधान गति शक्ती योजनेंतर्गत कामांना गती दिली जाईल. मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार आहे. 40 हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील. विमानतळांची संख्या वाढली आहे. एव्हिएशन कंपन्या एक हजार विमानांची ऑर्डर देऊन पुढे जात आहेत, असे निर्मला सीतारमण म्हणाल्या आहेत.
- 11:59 AM • 01 Feb 2024Budget 2024 parliament session live : 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवलेलखपती दीदी योजनामध्ये वाढ करण्यात येत आहे. दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे.
- 11:51 AM • 01 Feb 2024Budget 2024 parliament session live : दर महिन्याला 300 युनिट वीज मोफत देणारगर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी लसीकरण करणार आहोत, अशी माहिती निर्मला सीतारामण यांनी दिली. 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण केले जाईल. येत्या 5 वर्षांत विकासाची नवी व्याख्या तयार करू. आशा भगिनींनाही आयुष्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तेलबियांवरील संशोधनाला चालना दिली जाईल. दर महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत.
- 11:51 AM • 01 Feb 2024Budget 2024 parliament session live : ग्रामीण भागात खरं उत्पन्न वाढलं आहेmumbaitak
- 11:34 AM • 01 Feb 2024Budget 2024 parliament session live : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दोन कोटी घरे बांधणारदेशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. आमच्या सरकारचे लक्ष पारदर्शक कारभारावर आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जातील, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
- 11:22 AM • 01 Feb 2024Budget 2024 parliament session live : पंतप्रधान किसान योजनेतून 11.8 कोटी लोकांना आर्थिक मदतदेशातील 78 लाख स्ट्रीट वेंडर्सना मदत देण्यात आली आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पंतप्रधान किसान योजनेतून 11.8 कोटी लोकांना आर्थिक मदत मिळाली आहे. तीन हजार नवीन आयटीआय उघडण्यात आल्या आहेत. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे.
- 11:17 AM • 01 Feb 2024Budget 2024 parliament session live : 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम कृषी विमा योजनेचा लाभ80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप, 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र असेल, दिव्यांगाना सशक्त करण्यासाठी सरकार योजना राबवतेय, 3 लाख कोटींचा व्यापार शेती क्षेत्रातून होतोय, 390 कृषी विद्यापीठे सूरू केली, 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम कृषी विमा योजनेचा लाभ मिळाला आहे.
- 11:11 AM • 01 Feb 2024Budget 2024 parliament session live :देशात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या - निर्मला सीतारमणदेशातील जन ता भविष्याकडे पाहत असून ते आशावादी आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जात आहोत. 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी कामाला सुरुवात केली तेव्हा अनेक आव्हाने होती. पण आम्ही जनहितार्थ काम सुरू केली.
- 11:05 AM • 01 Feb 2024Parliament Budget Session Live : निर्मला सीतारामण यांच्याकडून बजेट वाचनास सुरूवातनिर्मला सीतारामण यांच्याकडून बजेट वाचनास सुरूवात
- 11:00 AM • 01 Feb 2024Budget 2024 parliament session live : बजेटमधून मराठा आरक्षण देता येईल तर द्या- मनोज जरांगेबजेटमध्ये मला काही कळत नाही. कारण पैसै मी हानीत नाही. मुंबईमध्ये गेल्यावर ज्यांच बजेट कोलमडलं ना, ते म्हणतात आम्हाला काही मिळालं नाही, असा टोला जरांगे यांनी भुजबळांना लगावला. तसेच पण बजेटमध्ये मराठा आरक्षण देता आले तर फाटकून द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
- 10:44 AM • 01 Feb 2024मोदी मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला दिली मंजुरीराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर मोदी मंत्रिमंडळानेही अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे निवडणुकीचे वर्ष आहे, त्यामुळे हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांचे भाषण थोड्याच वेळात सुरू होणार आहे.
- 10:40 AM • 01 Feb 2024बजेटमध्ये शेतकरी, नोकरवर्ग आणि महिलांना प्राधान्य?मोदी सरकार कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. किसान सन्मान निधीची रक्कम वाढवता येईल. सर्वसामान्यांसाठी टॅक्स स्लॅबमध्ये सूट वाढवता येऊ शकते. आरोग्य क्षेत्रातही तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. शेतकरी, कामगार वर्ग आणि लघुउद्योगांनाही लाभ मिळू शकतो.
- 09:39 AM • 01 Feb 2024निर्मला सीतारमण यांचे बजेट टीमसोबत फोटोसेशनअर्थमंत्रालय सोडल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संपूर्ण बजेट टीमसोबत औपचारिक फोटो सेशन केले आहे. या फोटोसेशननंतर त्या राष्ट्रपती भवनाकडे निघाल्या आहेत. राष्ट्रपतींकडून अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर त्या संसदेत पोहोचतील आणि त्यानंतर अर्थसंकल्प सादर करतील.
- 09:06 AM • 01 Feb 2024निर्मला सीतारमण किती वाजता अर्थसंकल्प सादर करणार?अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 7.30 नंतर त्यांच्या घरातून बाहेर पडतील. सकाळी 8:15 वाजता अर्थ मंत्रालयाच्या गेट क्रमांक 2 वर बजेट तयार करणाऱ्या टीमचे फोटो सेशन होईल. सकाळी 8.45 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि अर्थसंकल्पाला मंजुरी देतील.
- 08:56 AM • 01 Feb 2024मोदी सरकार सर्वसामान्यांना काय गिफ्ट देणार?केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मोदी सरकारचा यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा अंतिम अर्थसंकल्प आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळेच अन्नदाता शेतकरी, महिला, तरुण, गरीबांना, व्यापारी यांना डोळ्यांसमोर ठेऊन हा अर्थसंकल्प असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT