दक्षिण मुंबईतील पाच मजली इमारतीचा भाग कोसळला, ३५ जणांना बाहेर काढलं

मुंबई तक

• 05:44 AM • 25 Jun 2021

दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरातील एका पाच मजली इमारतीचा भाग आज सकाळी साडे सात वाजल्याच्या दरम्यान कोसळला. ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती मिळत असून आतील ३५ जणांना बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार या इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरु होतं. ही इमारत जुनी असल्यामुळे आतल्या बाजुला डागडुजीचं काम सुरु होतं. याच भागाची […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरातील एका पाच मजली इमारतीचा भाग आज सकाळी साडे सात वाजल्याच्या दरम्यान कोसळला. ही इमारत म्हाडाची असल्याची माहिती मिळत असून आतील ३५ जणांना बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे.

हे वाचलं का?

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार या इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरु होतं. ही इमारत जुनी असल्यामुळे आतल्या बाजुला डागडुजीचं काम सुरु होतं. याच भागाची पडझड झाल्याचं समोर येत आहे. सकाळी साडेसात वाजल्याच्या दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मजल्य़ाचा स्लॅब कोसळला. पडझड सुरु होताच ३५ जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर कमी असला तरीही धोकादायक इमारतींचा प्रश्न प्रामुख्याने समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी मालाड येथील इमारत दुर्घटनेत काही जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. ज्यानंतर मुंबई महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींना नोटीस पाठवली होती. सुदैवाने या प्रकरणात कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये.

    follow whatsapp