Pathaan Movie Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) पठाणचा (Pathaan Movie) जलवा कायम आहे. (King Khan Shahrukh Khan) बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या चित्रपटाची लोकांची क्रेझ क्लाउड नाइनवर आहे. पठाण दररोज बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करून इतिहास रचत आहे. रिलीजच्या 10 व्या दिवशीही पठाणने दुहेरी अंकात कमाई करून नवा पायंडा पाडला आहे. Pathan movie continues to shine
ADVERTISEMENT
Pathaan Movie : ‘पठाण’ चित्रपटाने बॉलिवूडसाठी बदलल्या या ५ गोष्टी
पठाणचा जलवा कायम
पठाण बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानच्या चित्रपटाने सिनेमागृहांचे ग्लॅमर परत आणले आहे. बरेच दिवस बंद असलेल्या चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रेक्षक येऊ लागले आहेत. रिलीजच्या 9-10 दिवसांनंतरही पठाणचे बहुतेक शो हाऊसफुल्ल होत आहेत. पठाण दररोज यशाचे नवनवे विक्रम करत आहे.
पठाणच्या दहाव्या दिवसाची आकडेवारीही समोर आली आहे. शाहरुख खानच्या चित्रपटाने 10व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी दुहेरी अंकात कमाई करून तोच बॉलिवूडचा खरा राजा असल्याचे दाखवून दिले आहे. होय, सुरुवातीच्या अंदाजानुसार शाहरुखच्या चित्रपटाने 10व्या दिवशी 13 ते 15 कोटींची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाचे भारतातील नेट कलेक्शन 378-380 कोटींच्या जवळ पोहोचले आहे. म्हणजे पठाण 400 कोटींचा आकडा गाठण्याच्या अगदी जवळ आहे.
‘इतकी अश्लिलता आणता कुठून?’, विवेक अग्निहोत्रींचा ‘पठाण’वर निशाणा
वर्ल्ड वाईड पण पठाणची हवा
जगभरातील बॉक्स ऑफिसवरही पठाणची धूम आहे. पठाणच्या जगभरातील कलेक्शनने 9 दिवसांत 700 कोटींचा आकडा पार केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनर चित्रपट बनून पठाणने इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले आहे. पहिल्या वीकेंडमध्ये धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर, पठाण दुसऱ्या आठवड्यातही चमकत आहे. पठाण हा शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. दुसऱ्या वीकेंडमध्येही पठाण चांगली कमाई करून नवा विक्रम प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा आहे.
ADVERTISEMENT