शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडी अर्थात सक्तवसुली संचलनायलाचे पथक दाखल झाले. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ जमीन प्रकरणात गैरव्यवहार केल्याचे आरोप असून, गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT
पत्रा चाळ प्रकरणात ईडीने संजय राऊतांना समन्स बजावलेलं होतं. मात्र, संजय राऊत चौकशीसाठी हजर राहिले नाही. त्यानंतर ईडीकडून पुन्हा समन्स पाठवलं जाऊ शकतं, अशी चर्चा सुरू असतानाच आज ईडीचं पथक त्यांच्या घरी दाखल झालं. संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी ईडीचे अधिकारी पोहोचले असून, त्यांची चौकशी केली जाणार आहे.
यापूर्वी १ जुलै रोजी खासदार संजय राऊत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांची १० तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांना २० जुलै आणि २७ जुलै रोजी समन्स बजावण्यात आलेलं होतं, मात्र ते चौकशीसाठी हजर राहिले नाही.
संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यात ईडीचं पथक असून, बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संजय राऊत यांच्यामागे ज्यामुळे ईडीचा फेरा लागला, ते पत्रा चाळ प्रकरण काय?
संजय राऊतांचा आज हिशोब होणार – किरीट सोमय्या
ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मोठं विधान केलं आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, “मी संजय राऊत यांच्या लुटमार, भ्रष्टाचार, माफियागिरी, दादागिरी यांचे पुरावे देत होतो. महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती. महाविकास आघाडीचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे संजय राऊतांचे अत्याचारामध्ये भागीदार झाले होते. आता सगळ्याचा हिशोब देण्याची वेळ आली आहे आणि मला खात्री आहे की, महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची लुटमार करण्याचा, दादागिरी, माफियागिरी करणाऱ्या संजय राऊतांचा आज हिशोब होणार.”
Deepak Kesarkar : बाळासाहेब ठाकरे असते तर संजय राऊत यांना शिवसेनेतून हाकलून दिलं असतं
“मी आरोप एकदाही केले नाहीत. मी पुरावे दिले आहेत. संजय राऊतांची १४ कोटींची संपत्ती जप्त झाली आहे, ती आरोपांमुळे नाही तर पुराव्यांमुळे. मला विश्वास आहे की, संजय राऊतांना नवाब मलिकच्या शेजारी राहायला जायला हवं, अशी माझी आहे इच्छा आहे. प्रार्थना आहे. कारवाई सुरू झालेली आहे. संजय राऊत पळापळ करत होते. काही तरी काळंबेरं होतं म्हणून धावपळ सुरू होती. आता हिशोब द्यायला जावं लागणार,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT