अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासमोरचं संकट काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीये. बॉम्बे हायकोर्टाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करुन सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्र व कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर नागपूर खंडपीठात माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दाखल केलेल्या याचिकेवरही लवकरच निकाल येणं अपेक्षित आहे.
ADVERTISEMENT
नवनीत राणांची खासदारकी धोक्यात? Bombay High Court ने जात प्रमाणपत्र केलं रद्द
आनंदराव अडसूळ यांनी नवनी राणांविरोधात दोन याचिका दाखल केल्या होत्या. यातील बनावट जात प्रमाणपत्राबद्दल दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने निकाल दिला. तर नागपूर खंडपीठासमोर अडसूळ यांनी अमरावती मतदार संघाची निवडणूकच रद्द करण्यात यावी अशी याचिका दाखल केली होती. नवनीत राणा यांनी आपल्या शपथपत्रात जातीबद्दल खोटी माहिती दिल्यामुळे ही निवडणूक रद्द करण्याची मागणी अडसूळ यांनी याचिकेद्वारे केली होती.
नागपूर खंडपीठात अडसूळ यांची बाजू मांडणारे वकील राघव कवीमंडन यांनी मुंबई तक शी बोलताना याबद्दल माहिती दिली. येत्या काही दिवसांत नागपूर खंडपीठात अडसूळ यांच्या याचिकेवर निकाल लागला जाण्याची शक्यता आहे. हा निकाल नवनीत राणा यांच्याविरोधात गेल्यास राणा यांची खासदारकी धोक्यात येऊन पुन्हा एकदा पोटनिवडणुक घेतली जाऊ शकते.
ADVERTISEMENT