पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरू आहे. मंगळवारी पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. देशात पेट्रोलच्या किंमतीत लिटरमागे 24 पैसे तर डिझेलच्या दरात लिटरमागे 25 पैसे वाढ झाली आहे. एक महिन्यात पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची ही 13 वी वेळ आहे. पश्चिम बंगालसह ज्या पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर ही दरवाढ केली जाते आहे. मुंबईत लवकरच पेट्रोल आणि डिझेल शंभर रूपये लिटरने मिळू लागणार आहे. कारण मुंबईत आज दरवाढ झाल्यानंतरचा दर पेट्रोलसाठी प्रति लिटर 99 रूपये 75 पैसे इतका झाला आहे तर डिझेलचा दर 99 रूपये 61 पैसे इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
‘चार राज्यांचे निवडणूक निकाल लागले, आता पेट्रोल डिझेलचे दर वाढणार की काय?’
कोणत्या जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे?
शहर पेट्रोलचा दर प्रति लिटर डिझेलचा दर प्रति लिटर
परभणी 101 रूपये 9 पैसे 92 रूपये 46 पैसे
सिंधुदुर्ग 101 रूपये 20 पैसे 91 रूपये 63 पैसे
नांदेड 101 रूपये 91 रूपये 26 पैसे
रत्नागिरी 100 रूपये 99 पैसे 91 रूपये 43 पैसे
जळगाव 100 रूपये 86 पैसे 91 रूपये 28 पैसे
नाशिक 100 रूपये 19 पैसे 90 रूपये 63 पैसे
वर्धा 100 रूपये 07 पैसे 90 रूपये 55 पैसे
8 वर्षापूर्वी सीतारमण पेट्रोल दरवाढीवर काय म्हणाल्या होत्या?
महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. मुंबई आणि ठाण्यातही पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. 4 मेपासून आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत इंधन दरवाढ सुरूच आहे. पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या त्याचे निकाल लागले आणि इंधन दरवाढीला सुरूवात झाली. मागच्या 22 दिवसांमध्ये पेट्रोल प्रति लिटर 2 रूपये 74 पैशांनी तर डिझेल हे 3 रूपये 4 पैशांनी महाग झाले आहेत. पेट्रोलसह डिझेलचेही दर वाढल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा थेट परिणाम होताना दिसतो आहे. सामान्यांकडून हे दर कमी करण्याची मागणी सातत्याने होते आहे तरीही दर कमी होताना दिसत नाहीत उलट वाढत आहेत हेच दिसतं आहे.
ADVERTISEMENT