Petrol-Diesel Price Today: महागाई वाढता वाढता वाढे.. 5 दिवसात पेट्रोल-डिझेल 3.20 रुपयांनी महागलं!

मुंबई तक

• 05:06 AM • 26 Mar 2022

Petrol Price Diesel Rate Today 26 March 2022 Updates: पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर आता देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज (शनिवार) 26 मार्च रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या आठवड्यातील पाच दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Fuel Price) वाढ करण्यात आली आहे. […]

Mumbaitak
follow google news

Petrol Price Diesel Rate Today 26 March 2022 Updates: पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर आता देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज (शनिवार) 26 मार्च रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या आठवड्यातील पाच दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Fuel Price) वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी वाढ केली आहे. अशाप्रकारे पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एकूण 3.20 रुपयांनी वाढ झाली आहे.

हे वाचलं का?

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, आज (शनिवार) म्हणजेच 26 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलची किंमत 98.61 रुपये प्रति लिटर तर डिझेलची किंमत 89.87 रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे.

तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 26 मार्च 2022 रोजी पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.51 रुपये वरून 113.35 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलचा दर आता 96.70 रुपयांवरून 97.55 रुपये प्रति लिटर झाला आहे. दिल्लीशिवाय इतर सर्व महानगरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे विकले जात आहे.

  • दिल्ली – 98.61 (पेट्रोल), 89.87 (डिझेल)

  • मुंबई – 113.35 (पेट्रोल), 97.55 (डिझेल)

  • कोलकाता – 108.02 (पेट्रोल), 93.01 (डिझेल)

  • चेन्नई- 104.43 (पेट्रोल), 94.47 (डिझेल

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

  • पुणे 112.37 (पेट्रोल) 95.13 (डिझेल)

  • कोल्हापूर 112.68 (पेट्रोल) 95.46 (डिझेल)

  • नागपूर 112.22 (पेट्रोल) 95.02 (डिझेल)

  • औरंगाबाद- 114.17 (पेट्रोल), 98.35 (डिझेल)

5 दिवसात 4 वेळा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

एका आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 5 दिवसात 4 वेळा वाढल्या आहेत. 22 मार्च रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर 23 मार्च रोजी दोन्ही इंधनांच्या किमती 80-80 पैशांनी वाढल्या होत्या. त्याच वेळी, 25 आणि 26 मार्च रोजी देखील तेल कंपन्यांनी राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ केली आहे.

पेट्रोल-डिझेल सोडा आता CNG च्या भावाने नागपूरकरांच्या खिशाला कात्री

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या बाजारात चढ-उतार होत आहेत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 139 डॉलरवर जाऊन पोहोचला आहे. तथापि, मध्यंतरी कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली होती. पण त्याचवेळी, आता पुन्हा ब्रेंट क्रूडच्या किंमतीत थोडीशी उसळी पाहायला मिळत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज केले जातात बदल

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केल्या जातात. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची माहिती अपडेट करतात. नोव्हेंबरपासून भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. पण आता त्यांना पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती अशा पद्धतीने जाणून घ्या:

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज समजू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

    follow whatsapp