पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांपासून इंधन दराचा उडालेला भडका कायम आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला असून, दररोज किंमती वाढत आहेत. गेल्या तीन सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशातील प्रमुख चार महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत.
ADVERTISEMENT
भारतीय तेल वितरक कंपन्यांनी रविवारी (3 ऑक्टोबर) पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली. पेट्रोलच्या दरात लिटरमागे २५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३० पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत.
प्रमुख शहरातील आजचे दर काय आहेत?
तेल वितरक कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलच्या दरात ३० वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या माहितीप्रमाणे देशातील महानगरांमधील पेट्रोल-डिझेलच्या दरांची तुलना केली, तर सर्वाधिक दर मुंबईत आहेत.
दिल्लीत पेट्रोल १०२.३९ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल ९०.७७ रुपये लिटर आहे. मुंबईत पेट्रोल लिटरमागे १०८.४३ रुपये, तर डिझेल ९८.४८ रुपये लीटर आहे. कोलकात्यात पेट्रोल १०३ रुपये प्रतिलिटर असून डिझेल ९३.८७ रुपये लिटर आहे. चेन्नईत पेट्रोलचे दर १००.०१ लिटर असून, डिझेल ९५.३१ प्रतिलिटर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याचे परिणाम भारतात दिसत आहे. देशातील इंधनाचे दर झपाट्याने वाढत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. भारतात आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 78 डॉलरवर पोहोचले आहेत. त्याची झळ थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागली आहे.
तुमच्या शहरातील इंधनाचे दर असे घ्या जाणून…
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल वितरक कंपन्या प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती निर्धारित करतात (दरात वाढ किंवा घट). त्याची माहिती कुणालाही घेता येऊ शकते. तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्यायचे असतील, RSP असा मेसेज 9224992249 या क्रमांकावर केल्यानंतर दरांची माहिती मिळेल.
ADVERTISEMENT