मुंबई: Petrol and Diesel Rate Updates: सरकारी तेल कंपन्यांनी आज (गुरुवारी) म्हणजे 30 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या ( Petrol-Diesel) किंमतीत वाढ केली आहे. IOCL च्या मते, आज देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 30 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
देशातील सर्वात मोठी इंधन किरकोळ विक्रेता इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) च्या मते, 30 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलची किंमत 25 पैशांनी वाढून 101.64 रुपये आणि डिझेलची किंमत 30 पैशांनी वाढून 89.87 रुपये प्रति लिटर झाली आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलची किंमत 107.71 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 97.52 रुपये प्रति लिटर.
काही राज्यातील पेट्रोलचे दर
-
मुंबई – 101.64
-
दिल्ली – 107.71
-
कोलकाता – 102.17
-
चेन्नई – 99.36
काही राज्यातील डिझेलचे दर
-
मुंबई – 89.87
-
दिल्ली – 97.52
-
कोलकाता – 92.97
-
चेन्नई – 94.45
24 सप्टेंबरपासून डिझेलचे दर चार वेळा वाढले
गेल्या 4 दिवसात देशभरात डिझेलच्या किंमतीत 4 वेळा वाढ करण्यात आली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीत 20 पैशांनी, 26 सप्टेंबरला 25 पैसे प्रति लिटर, त्यानंतर 28 सप्टेंबरला देखील डिझेलच्या किंमतीत वाढ केली होती.
परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतीवर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. तेल विपणन कंपन्या दररोज किंमतींचा आढावा घेऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची माहिती अपडेट करतात.
तुम्ही तुमच्या शहरात दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत फक्त एका एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑईल (IOCL) च्या ग्राहकांना फक्त RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.
समजून घ्या : पेट्रोल-डिझेलच्या किंमती का वाढतच राहणार?
पेट्रोल-डिझेलच्या किंमत कशा ठरतात?
सौदी अरेबिया, इराक-इराणसारख्या आखाती देशांमधून कच्चे तेल भारतातल्या तेल कंपन्या आयात करतात, तिथे त्यांच्यावर इम्पोर्ट ड्युटी लागते. थोडक्यात आपण दुसऱ्या देशातून आपल्या देशात एखादी गोष्ट आणतो, त्यासाठी मोजावी लागणारी किंमत.
आता भारतात कच्चे तेल आल्यानंतर ते जातं पहिले रिफायनरीमध्ये. तिथे ते प्रोसेस होतं, म्हणजेच त्या कच्च्या तेलाचं सीएनजी, केरोसिन, डिझेल, पेट्रोल असे वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात.
रिफायनरीमधून जेव्हा पेट्रोल-डिझेल बाहेर पडतं, तेव्हा कंपन्या केंद्र सरकारला एक्साईज ड्युटी देतात.
त्यानंतर पेट्रोल-डिझेल डेपोमध्ये जातं आणि मग रिटेलरकडे जातं. रिटेलरकडे येताना पहिले राज्य सरकार त्यावर एक कर आकारतं, त्याला आपण VAT किंवा सेल्स टॅक्स म्हणतो. यानंतर जेव्हा रिटेलरकडे येतं, तेव्हा तो त्याचं कमिशन लावतो.
थोडक्यात सांगायचं झालं तर इम्पोर्ट ड्युटी, एक्साईज ड्युटी, सेल्स टॅक्स, रिटेलरचं कमिशन अशा सगळ्या किंमती आपण मोजतो. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या करांमुळेच आज भारतातील पेट्रोलचे दर हे 100 रुपयांच्या देखील पुढे गेले आहेत.
ADVERTISEMENT