पेट्रोलची सेंच्युरी, महागाई सामान्यांचं कंबरडं मोडणार

मुंबई तक

• 02:14 AM • 15 Feb 2021

गेल्या काही दिवसांपासून शंभरीकडे वाटचाल करत असलेल्या पेट्रोलने अखेरीस शतक झळकावलेलं आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अनुक्रमे २९ आणि ३२ पैशांनी वाढ केली. या वाढीनंतर देशातील काही ठिकाणी पेट्रोलने शंभरीचा आकडा गाठला आहे. महाराष्ट्रातील परभणी शहरात प्रिमीअम क्वालिटीच्या पेट्रोलसाठी १०० रुपये तर साध्या पेट्रोलसाठी ९७ रुपये मोजावे लागत आहेत. […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही दिवसांपासून शंभरीकडे वाटचाल करत असलेल्या पेट्रोलने अखेरीस शतक झळकावलेलं आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अनुक्रमे २९ आणि ३२ पैशांनी वाढ केली. या वाढीनंतर देशातील काही ठिकाणी पेट्रोलने शंभरीचा आकडा गाठला आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातील परभणी शहरात प्रिमीअम क्वालिटीच्या पेट्रोलसाठी १०० रुपये तर साध्या पेट्रोलसाठी ९७ रुपये मोजावे लागत आहेत. काही पेट्रोल पंपांवर जुन्या मशीनमध्ये तीन अंकी किंमत दाखवण्याची सोय नसल्यामुळे पंपचालकांनी पेट्रोलची विक्री थांबवली. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही पेट्रोलच्या किमतींचा भडका उडालेला आहे.

महाराष्ट्रात परभणीचा अपवाद वगळता मुंबई, नागपूर, औरंगाबाद, हिंगोली, नांदेड, जळगाव, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा अशा शहरांतही पेट्रोलचे भाव हे शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत सामान्यांचा भाजीपाला, फळं, दुध यासारख्या गोष्टींच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचं ऐकायला मिळू शकतं.

    follow whatsapp