पिंपरी चिंचवडमधील काटे पुरम चौकात भरदिवसा गोळीबार; सीसीटीव्हीत कैद झाली घटना

मुंबई तक

• 08:40 AM • 18 Dec 2021

गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारी घटनांमुळे सातत्याने चर्चेत असून, आता भरदिवसा गोळीबाराची थरारक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील काटे पुरम चौकात दोन व्यक्तींनी गोळीबार केला. गोळीबाराची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, या घटनेनं पिंपरी चिंचवडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं चाललंय काय? अशा घटना गेल्या काही […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारी घटनांमुळे सातत्याने चर्चेत असून, आता भरदिवसा गोळीबाराची थरारक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील काटे पुरम चौकात दोन व्यक्तींनी गोळीबार केला. गोळीबाराची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, या घटनेनं पिंपरी चिंचवडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

हे वाचलं का?

पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं चाललंय काय? अशा घटना गेल्या काही दिवसांपासून शहरात घडत आहेत. शहरातील काटे पुरम चौकात आज (18 डिसेंबर) गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सकाळी 11 वाजता एका व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पुणे : दोन महिलांचा एकमेकांच्या पतीवर बलात्काराचा आरोप

दोन व्यक्ती समोरून येताना दिसत आहे. त्यानंतर या दोघांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. काही अंतर पाठलाग करत आरोपींनी गोळ्या झाडल्या. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र या गोळीबारात योगेश जगताप नावाचा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

गोळीबाराच्या घटनेचे गांभीर्य पाहून सांगवी पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले व त्या नंतर या परिसरातील एक CCTV मध्ये कैद झालेल्या फुटेज च्या आधारावर पुढे गोळीबार करणार्‍या आरोपीचा शोध घेत आहेत.

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध! पुणे-सोलापूर महामार्गावर गोळीबार; दोघांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या भावाच्या कार्यालयावरही फेकला होता पेट्रोल बॉम्ब

काही दिवसांपूर्वी शहरात अशीच घटना घडली होती. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकटे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पिंपळे सौदागर येथे त्यांचे कार्यालय आहे. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी सोबत घेऊन आलेले दोन पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या दिशेने फेकले होते. फेकण्यात आलेला हा पेट्रोल बॉम्ब जगताप यांच्या कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीजवळ पडला होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

    follow whatsapp