PIL Against Uddhav Thackeray Family : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दादरमधल्या रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे यावर आज सुनावणी झाली.
ADVERTISEMENT
याचिकेत काय मागणी करण्यात आली आहे ?
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचं उत्पन्न तसंच त्यांची संपत्ती यांचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे या प्रकरणी सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी केली जावी ही मुख्य मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसंच याचिकेत हा आरोप करण्यात आला आहे की उद्धव ठाकरे यांची संपत्ती भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे. याविरोधात ११ जुलै २०२२ ला मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून आम्ही तक्रारही केली आहे.
मात्र अद्याप यावर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रींगचे पुरावे असूनही कारवाई का होत नाही? असाही प्रश्न या याचिकेत विचारण्यात आला आहे. या याचिकेत केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय अर्थ मंत्रालय, सीबीआय, मुंबई पोलीस आयुक्त, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे या सगळ्यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या गौरी भिडे कोण आहेत?
सामना दैनिक आणि मार्मिक हे साप्ताहिक प्रकाशित करणारा ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीचा प्रबोधन प्रकाशनचा छापखाना जिथे आहे त्याच्या शेजारीच गौरी भिडे यांच्या आजोबांचा राजमुद्रा प्रकाशन हा छापखाना होता. सामना आणि मार्मिक यांच्या विक्रीतून एवढी अफाट संपत्ती गोळा होणं, मातोश्री २ सारखी उंच इमारत उभी राहणं, आलिशान गाड्या, फार्म हाऊसेस घेणं निव्वळ अशक्य आहे. कारण आमचाही व्यवसाय तोच असल्याने आमच्या आणि त्यांच्या मिळकतीत जमीन आस्मानाचा फरक कसा असाही प्रश्न याचिकेत विचारण्यात आला आहे.
ADVERTISEMENT