मुंबई: ‘ज्या माणसाला अमेरिकेने व्हिसा नाकारला होता त्याच माणसाची आज जगातल्या पहिल्या दहा अत्यंत मोठ्या अशा शक्तीशाली लोकांमध्ये त्यांची गणना होते आणि त्याचा सन्मान केला जातो हे पाहवत नाहीए. आग होतेय ती ही होतेय.’ असं म्हणत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मोदी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
देशाला खरं स्वातंत्र्य 2014 सालानंतरच मिळालं या आपल्या विधानावर ठाम असलेल्या विक्रम गोखले यांनी शुक्रवारी (19 नोव्हेंबर) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक राजकीय गोष्टींवर आपलं परखड मत मांडलं आहे.
पाहा विक्रम गोखले काय-काय म्हणाले
‘तर तुमचे शिरच्छेद होतील..’
‘जर आत्ताच सावध झाला नाहीतर तर तुमचे शिरच्छेद होतील.. जो माणूस पृथ्वीतलावरचा एका विशिष्ट गोष्टीला मानत त्याचा शिरच्छेद करा, त्याला कापून काढा. तुकडे करा असं एक धर्म शिकवतो. हा धर्म गेली दीड हजार वर्ष इथे तळ ठोकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी तळ ठोकू नये म्हणून काही जण कार्यरत आहेत. काही जण त्यांनी आपलं निमंत्रण स्वीकारावं यासाठी त्यांचे पाय चाटतायेत.’ अशी टीका गोखलेंनी केली आहे.
‘काही राजकीय पक्षांना वाटत नाही की, देश एकसंध राहावा’
‘हे सगळे मतपेट्यांसाठी राजकारण करणारेच आहेत. अशा राजकारण्यांचा मला प्रचंड राग येतो. ज्यांना भीक मागता येत नाही पण त्यांना ओरबाडून घ्यायचीय सत्ता.. भूक लागलेलीय सत्तेची असे सगळे जे राजकीय नेते, पक्ष त्यांना हे पाहवत नाही की हा देश एकसंध राहावा. हा देश पॉवरफुल व्हावा.’ अशी टीकाही विक्रम गोखलेंनी केली आहे.
‘मोदींची गणना शक्तीशाली लोकांमध्ये, म्हणून यांची आग होते’
‘आज कोणालाही सहन होत नाही सुडो सेक्युलारिझम जोपासणाऱ्यांना, सगळ्या बुद्धीजीवींना सहन होत नाही. की, ज्या माणसाला अमेरिकेने व्हिसा नाकारला होता त्याच माणसाला आज जगातल्या पहिल्या दहा अत्यंत मोठ्या अशा शक्तीशाली लोकांमध्ये त्यांची गणना होते आणि त्याचा सन्मान केला जातो हे पाहवत नाहीए. आग होतेय ती ही होतेय. कारण यांना देशाचे तुकडेच व्हायला पाहिजेत.’ असं म्हणत गोखलेंनी मोदी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
‘तेव्हा सिद्ध होतं की, हा देश लोकशाहीचाच’
‘या देशात आम्हाला भीती वाटते, इथून निघून जावंसं वाटतं. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे नाही तर आम्ही तुकडे करु असं म्हणण्याचं धाडस जेव्हा तुम्ही एखाद्या संसंदीय लोकशाहीत करतात आणि ते ऐकलं जातं तेव्हा तो देश हा लोकशाहीचाच आहे हे सिद्ध होतं.’
‘तरीही तुम्हाला आणखी स्वातंत्र्य कसलं पाहिजे. याच स्वातंत्र्याचा मत, भाषण, लेखन स्वातंत्र्याचा उपयोग करणारा माझ्यासारखा माणूस अशाच्या तोंडून काही वाक्य आली तर लगेच काड्या लावणं सुरु.’ असंही ते यावेळी म्हणाले.
Vikram Gokhale: ‘तो’ विश्वासघातच होता, पण वेळ गेलेली नाही; Shiv Sena-BJP ने पुन्हा एकत्र यावं’
‘…त्या भीतीने सगळे एकत्र येतात आणि भुंकायला सुरुवात करतात’
‘समविचारी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आपल्या छाताडावर नाचू नये. नाचतील की काय या भीतीपोटी हे जे असुरक्षित झालेले जे राजकीय पक्ष आहेत त्याच्यात सगळे आहेत. कोणताही एक पक्ष वेगळा नाही. एरवी हे एकमेकांचे तोंड पाहत नाही. कुत्र्यासारखे एकमेकांवर धावून जातात.’
‘कोणीतरी माणूस, एक पक्ष काही तरी वेगळं करतोय म्हटल्यावर.. देशाकरता हा पक्षाकरता नाही. देशाकरता कोणीतरी काही तरी करतो म्हटल्यावर तो लोकप्रिय होणार मग आमचं काय वाटोळं होईल या भीतीने सगळे एकत्र येतात आणि भुंकायला सुरुवात करतात. तसे हे सगळे हे आहेत. ही शंका नाहीए, माझी खात्री आहे.’ असं म्हणत गोखलेंनी अप्रत्यक्षरित्या विरोधकांवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT