मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील कोरोना (Corona) परिस्थिती ही अत्यंत बिकट असल्याचं पाहायला मिळत आहे. याच स्थितीचा नेमका आढावा आज (8 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM ModI) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना फोन करुन नेमकी परिस्थिती जाणून घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंनी राज्यातील कोरोना स्थितीविषयी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली असल्याची माहिती समजते आहे.
ADVERTISEMENT
पाहा पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?
पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जी केली त्याविषयी मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्रयाकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असंही सांगितलं.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले. (PM Modi spoke to Maharashtra CM on the Covid related situation in the state)
‘Vaccines मोदी सरकारने विदेशात पाठवल्या नसत्या तर आज तुटवडा भासला नसता’
पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
मुंबईकडून शिका, मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने सुनावलं!
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी Corona च्या जास्त केसेस असूनही ऑक्सिजनचा वापर योग्य प्रकारे कसा करायचा आणि कोरोना केसेस वाढत असतानाही कसं लढायचं हे जरा मुंबईकडून शिका असे खडे बोल सुनावले होते. ऑक्सिजन संकट दूर कऱण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही आदेश दिले होते. या आदेशांविरोधात मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावरच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मुंबई महापालिकेचं कौतुक केलं आहे.
Corona: मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात समन्वय आहे का? फडणवीस म्हणतात..
ऑक्सिजन संकट दूर कऱण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही आदेश दिले होते. या आदेशांविरोधात मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावरच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मुंबई महापालिकेचं कौतुक केलं आहे.
मुंबईचं उदाहरण देताना न्यायलयाने म्हटलं होतं की मुंबईसारख्या अधिक लोकसंख्येच्या शहरात बफर स्टॉक केला जाऊ शकतो तर मग दिल्लीसारख्या शहरातही केला जाऊ शकतो. कोरोना काळात मुंबईने बजावलेली कामगिरी उत्तम आहे दिल्लीने त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन कसा आणि कधी मिळणार हे सोमवारपर्यंत स्पष्ट करा असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
न्या. चंद्रचूड यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
आपण प्रसारमाधम्यांमध्ये हे बाब पाहतोच आहोत की मुंबई महापालिकेने अत्यंत लक्षवेधी कामगिरी कोरोना काळात केली आहे. महाराष्ट्रालाही ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोच आहे. त्यांनी जसं नियोजन केलं तसं नियोजन दिल्लीमधे का जमत नाही? दिल्लीला ऑक्सिजनचा पुरवठा कसा आणि कधी होणार ते सांगा. जो ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे त्याचं योग्य नियोजन का करण्यात आलं नाही? अधिकाऱ्यांवर कारवाई करून आणि त्यांना तुरूंगात टाकून ऑक्सिजनची गरज कशी भागवता येईल? जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. दिल्लीत कोरोनाने अत्यंत गंभीर स्वरूप धारण केलं आहे. गेल्या तीन दिवसात आलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत काय? ते स्पष्ट करा असं स्पष्टीकरण देखील चंद्रचूड यांनी केंद्र सरकारकडे मागितलं होतं.
ADVERTISEMENT