अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील ICU ला लागलेल्या आगीत १० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. एकीकडे संपूर्ण देश दिवाळीचा सण साजरा करत असताना नगरमध्ये रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांवर काळाने घाला घातला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून पंतप्रधान मोदींनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या अहमदनगर येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत प्राण गमावलेल्या रुग्णांची बातमी ऐकून मला खूप दुःख झालं. मी या मृत रुग्णांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. या अपघातातील जखमी लोकं लवकरात लवकप बरी होवू देत अशी मी प्रार्थना करतो.
दरम्यान, या अपघातात मृत पावलेल्या रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. बचावकार्यादरम्यान येथील एसी बंद करण्यात आल्यामुळे श्वास गुमदरुन किंवा आगीत होरपळून या रुग्णांचा अंत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
जाणून घेऊयात दुर्घटनेत आपला प्राण गमावलेल्या रुग्णांची नावं –
१) रामकिरण विठ्ठल खरपुडे – वय ७०
२) सिताराम दगडु जाधव – वय ८३
३) सत्यभामा शिवाजी घोडचौरे – वय ६५
४) कडुबाई गंगाधर खाटीक – वय ६५
५) शिवाजी सदाशिव पवार – वय ८२
६) दिपक विश्वनाथ जेडगुले – वय ३७
७) कोंडाबाई मधुकर कदम – वय ७०
८) आसराबाई नांगरे – वय ५८
९) ओळख पटलेली नाही
१०) अहमद सय्यद – वय ६५
दरम्यान या घटनेविषयी माहिती समजताच, अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. आपले सर्व नियोजीत दौरे रद्द करुन हसन मुश्रीफ हे नगरला रवाना झाले आहेत.
ADVERTISEMENT