PM Narendra Modi यांचं ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉईनबद्दल केली होती घोषणा

मुंबई तक

• 02:50 AM • 12 Dec 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटला यंदा हॅकर्सनी लक्ष केल्याचं दिसतंय. मध्यरात्री दोन वाजल्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीबद्दल मोठी घोषणा करण्यात आली. बिटकॉईनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचं मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगण्यात आलं. मोदींच्या या ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं होतं, ज्यानंतर मोदींचं हे अकाऊंट हॅक झाल्याचं समोर आलं. गेल्या काही […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटला यंदा हॅकर्सनी लक्ष केल्याचं दिसतंय. मध्यरात्री दोन वाजल्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीबद्दल मोठी घोषणा करण्यात आली. बिटकॉईनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचं मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगण्यात आलं.

हे वाचलं का?

मोदींच्या या ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं होतं, ज्यानंतर मोदींचं हे अकाऊंट हॅक झाल्याचं समोर आलं. गेल्या काही दिवसांपासून देशात बिटकॉईनबद्दल बऱ्याच चर्चा घडत असल्यामुळे मोदींच्या अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या या ट्विटमुळे खळबळ उडाली होती.

या हॅकींगबद्दल माहिती समजताच पंतप्रधान कार्यालयाने तात्काळ कारवाई करत ते वादग्रस्त ट्विट हटवलं आहे. ट्विटरच्या अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती देण्यात आली असून नरेंद्र मोदी यांचं अकाऊंट पूर्ववत करण्यात आलं आहे.

बिटकॉईनबद्दल नरेंद्र मोदींच्या अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटला खरं मानू नका असंही पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केलं आहे.

    follow whatsapp