Poker, MMA टेलिशॉपिंग, राज कुंद्राच्या व्यवसाय साम्राज्याचे वादग्रस्त भाग

मुंबई तक

• 10:31 AM • 21 Jul 2021

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. फक्त राज कुंद्राच नाही तर या प्रकरणात त्याच्यासह एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राचं हॉटशॉट अॅप कनेक्शन काय होतं ते देखील पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र ही पहिली वेळ नाही की राज कुंद्रा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्याने आपल्या व्यवसायाचं साम्राज्य तयार […]

Mumbaitak
follow google news

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. फक्त राज कुंद्राच नाही तर या प्रकरणात त्याच्यासह एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राचं हॉटशॉट अॅप कनेक्शन काय होतं ते देखील पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र ही पहिली वेळ नाही की राज कुंद्रा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्याने आपल्या व्यवसायाचं साम्राज्य तयार केलं. मात्र त्याच्या साम्राज्यात असे अनेक वादग्रस्त भाग येऊन गेले आहेत.

हे वाचलं का?

IPL या प्रसिद्ध क्रिकेट स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स या संघाची मालकी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीकडे होती. मात्र यामध्येही स्पॉट फिक्सिंगचे आरोप राज कुंद्रावर झाले. 2013 मध्ये ते प्रकरण उघडकीस आलं होतं. राज कुंद्राचा त्यावेळी झालेल्या स्पॉट फिक्सिंगमध्ये मध्यवर्ती सहभाग होता. त्यामुळे राज कुंद्रावर त्यावेळी बंदी घालण्यात आली. ज्यानुसार तो कोणत्याही आयपीएल टीमशी संबंधित राहू शकत नाही. आता त्याच्या पॉर्नोग्राफिक्स फिल्म निर्मितीची सगळी कहाणी समोर आली आहे. या प्रकरणातही मुख्यत्वे करून राज कुंद्राचाच प्रमुख सहभाग आहे. इतर सगळे लोक म्हणजे त्या साखळीचा एक भाग आहेत.

HotShot या App वर अश्लील व्हीडिओज आणि सेक्स कंटेट इतका वाढला होता की ते App आधी Appale Play Store आणि नंतर अँड्रॉईडने रिमूव्ह केलं. HD videos and Short movies असं या अॅपचं डिस्क्रिप्शन देण्यात आलं होतं. या अॅपवर जगभरातल्या मॉडेल्ससोबत लाईव्ह कम्युनिकेशनही करता येत होतं. या ठिकाणी तयार होणाऱ्या शॉर्ट फिल्म आणि वेब सीरिजमध्ये काम देतो असं आमिष पुरूष आणि स्त्री कलाकारांना दिलं जात होतं आणि त्यांच्याकडून न्यूड किंवा सेमी न्यूड सीन शूट करून घेतले जात होते. हेच सीन या App मध्ये प्रसारितही केले जात होते. मुंबई पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिली.

राज कुंद्रा यांना स्पोर्ट्स आणि टेक्निकल गोष्टी यामध्ये कायमच रस होता. त्याने कुठे कुठे गुंतवणूक केली या गोष्टी लक्षात घेतल्या तर पहिली होती ती आयपीएल मात्र त्या टीमवर आणि राज कुंद्रावर जे आरोप झाले त्यानंतर राज कुंद्रावर बंदी घालण्यात आली.

त्यानंतर राज कुंद्राने MMA फायटिंग लीगमध्येही पैसे गुंतवले होते. तसंच पोकर या गेमिंग लीगमध्येही गुंतवणूक केली होती. एवढंच नाही तर राज कुंद्राने टेलिशॉपिंग चॅनल बेस्ट डिल टीव्हीमध्येही गुंतवणूक केली होती. मात्र राज कुंद्रा प्रकाशझोतात येण्याचं कारण होतं त्याने त्याची बायको शिल्पा शेट्टीसोबत आयपीएलमध्ये गुंतवणूक केली होती. 2009 मध्ये राज कुंद्राने राजस्थान रॉयल्स या संघात 12 टक्के गुंतवणूक केली होती. राजस्थान रॉयल हा संघ 2008 मधला विजेता संघ होता. त्यामुळे राज कुंद्राला लगेचच प्रसिद्धी मिळाली. 2013 पर्यंत सगळं सुरूळीत सुरू होतं. मात्र 2013 मध्येच राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज हे दोन संघ स्पॉट फिक्सिंग करत असल्याची बाब समोर आली.

2015 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या पॅनलने दोन्ही टीम्सवर दोन वर्षांची बंदी घातली. त्यामुळे या दोन्ही टीम 2016 आणि 2017 मध्ये आयपीएल खेळू शकल्या नाहीत. स्पॉट फिक्सिंगचा वाद आणखी रंगला जेव्हा यामध्ये राज कुंद्रा आणि गुरूनाथ मयप्पन सामील असल्याची बाब समोर आली. त्यानंतर आयपीएलशी संबंधित सगळ्या गोष्टींबाबत राज कुंद्रावर बंदी घातली गेली.

2012 मध्ये राज कुंद्राने संजय दत्त सोबत मिळून MMA म्हणजेच mixed martial arts च्या लीगमध्येही पैसे गुंतवले होते. यावेळी अभिनेता संजय दत्त हा त्याचा पार्टनर होता. या लीगसाठी त्यांनी मेरी कोमलाही ब्रांड अँब्रसेडर म्हणून निवडलं होतं. ही लीग त्यावेळी ESPN स्टार स्पोर्ट्स, Colors, Nep Prime या चॅनल्सवर दाखवण्यात आली. तसंच यू ट्युबवरही ही लीग प्रसारित करण्यात आली.

त्यानंतर अशाच प्रकारे मॅच इंडियन पोकर लीग. ही लीगही राज कुंद्राच्या विहान इंडस्ट्रीजसोबत संलग्न होती. विहान इंडस्ट्रीजचा सहभाग गेमिंग, अॅनिमेशन या सगळ्यामध्ये होता.यानंतर राज कुंद्राने बेस्ट डिल टीव्हीमध्येही गुंतवणूक केली. हे 24-7 ऑनलाईन शॉपिंग चॅनल होतं. अभिनेता अक्षय कुमारचाही यामध्ये छोटासा सहभाग होता. हे चॅनल 2015 मध्ये सुरू झालं. ज्यानंतर ते सगळ्या प्रमुखे केबल नेटवर्क डीटीएच चॅनल्सवरही हे चॅनल दिसू लागलं.

या पाठोपाठ राज कुंद्राने JL stream PVt LTD नावाने एक यशस्वी व्यवसाय चालवला. सरकारच्या स्टार्ट अप इंडिया प्रकल्पाचा एक भागही होता. यावर लाईव्ह परफॉर्मन्स कुणालाही पोस्ट करण्याची मुभा होती. या कंपनीचं प्रमुख कार्यालय मुंबईत होतं. तर मुख्यालय हे लंडनमध्ये होतं. ही कंपनीही अल्पावधीत पसिद्ध झाली. तीन महिन्यात या कंपनीला 2 लाख डाऊनलोड मिळाले.

राज कुंद्रा हा एक यशस्वी व्यावसायिक मानला जात होता. मात्र काही प्रकरणं अशी घडली की ज्यामुळे त्याची बदनामी झाली. द शिल्पा शेट्टी फाऊंडेशनमध्येही त्याचा सहभाग आहे. एवढंच नाही तर राज कुंद्राने How not to make money या नावाने पुस्तकही लिहिलं आहे.हे पुस्तक 2013 मध्येच प्रकाशित झालं होतं. Champions of Change Award हा पुसस्कारही राज कुंद्रांना 2019 मध्ये देण्यात आला. स्वच्छ भारत मिशनमधल्या सहभागाबाबत त्यावेळचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते हा पुस्कार राज कुंद्राला देण्यात आला होता.

    follow whatsapp