वडापावचे ज्यादा पैसे का लावले अशी विचारणा करणाऱ्या तीन ग्राहकांना रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकासह ७-८ कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. मुंबई-पुणे महापालिकेच्या उर्से टोल नाक्यालगत असलेल्या फुडमॉलमधील रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आहे.
ADVERTISEMENT
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मुम्बई पुणे उर्से टोल नाक्या लगत असलेल्या “कार्निवल” नामक फूड मॉल मध्ये स्वप्नील ढोरे हे आपल्या 2 मित्रांसह नाश्ता करण्यासाठी गेला होता. स्वप्निलने वडापावची ऑर्डर केल्यानंतर जेव्हा त्याच्या हातात बिल आलं तेव्हा आपल्या वडापावचे बिलात जास्त पैसे लावल्याचं त्याला लक्षात आलं. यानंतर स्वप्निलने रेस्टॉरंटच्या कॅश काऊंटवर असलेल्या कॅशिअरला याबाबत तक्रार करुन मी जास्तीचे पैसे देणार नाही असं सांगितलं.
यानंतर कॅशिअरने बाहेर येत आपल्या सहकाऱ्यांना बोलवून स्वप्नीलसह त्याच्या मित्रांना लाठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या स्वप्नील आणि त्याच्या दोन मित्रांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घडलेल्या प्रकाराबद्दल स्वप्निलने शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यानंतर पोलिसांनी ७-८ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
Crime : ब्रेकअपमधून झालेल्या वादातून मैत्रिणीला बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी
ADVERTISEMENT