मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, कल्याण
ADVERTISEMENT
पोर्तुगाल येथील रहिवासी असलेल्या एका महिलेचा 2019 मध्ये विनयभंग करण्यात आला होता. ही महिला 2019 मध्ये भारतात फिरण्यासाठी आली होती. ही महिला गोवा दिल्ली निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून प्रवास करत होती. रात्री साडेअकराच्या सुमारास एका व्यक्तीने या महिलेसोबत एका माणसाने अश्लील वर्तन केलं. या महिलेने यासंदर्भातली तक्रार भारतीय दुतावासात केली होती. भारतीय दुतावासाने यासंदर्भातली माहिती रेल्वे पोलिसांना दिली.
बीड : दोन तरुणींनी तरुणाच्या घरी जाऊन केला विनयभंग; अंबाजोगाईत 3 जणांविरुद्ध गुन्हा
अनेक प्रकाराच्या प्रक्रिया करत या प्रकरणी कल्याण जी आर पी ने गुन्हा दखल केला. मात्र हा आरोपी कोण आहे या बाबत पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती. तसंच त्याचा कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती नव्हता. पोलिसांनी या महिलेला संपर्क साधला तेव्हा महिलेने आरोपीचे वर्णन सांगीतले. या वर्णनाच्या आधारे कल्याण जी आर पी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या पथकाने तपास सुरू केला. आरोपीला शोधण्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या. मात्र आरोपीचा शोध लागत नव्हता. वर्णनावरून आरोपीचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाचा आधार पोलिसांनी घेतला.
चेकअपच्या बहाण्याने कंपाऊंडरने ओपीडीत नेऊन 21 वर्षीय महिलेचा केला विनयभंग, लातूरमधली घटना
याच दरम्यान पोलिसांना जो नंबर मिळाला तो नंबर बंद होता. फेसबुक , ट्रू कॉलर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला. अखेर पोलिसांना यश आले. हा आरोपी आर्मीच्या केरळ युनिट मध्ये कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तपासा सुरू असताना आरोपी साहिशला कुणकुण लागली. त्याने कल्याण न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला हा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यानंतर त्याने बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली त्या ठिकाणी त्याचा अटक पूर्व जामीन नामंजूर झाला. याच दरम्यान पोलिसांना सहिश कल्याण मध्ये नातेवाईकांकडे लपला असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला अटक केली. अशा रितीने पोलिसांनी घडलेल्या प्रकरणी तीन वर्षांनी कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT