नागपूर : कोरोनातून बरं करण्याचा दावा करणाऱ्या ढोंगीबाबाला अटक

मुंबई तक

• 06:57 AM • 16 May 2021

स्वतःला देवी आणि नागदेवतेचा अवतार सांगून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या ढोंगी बाबाला नागपूर पोलीसांनी अटक केली आहे. कोरोनामधून बरं करण्याचा दावा करुन हा ढोंगीबाबा रुग्णांकडून पैसे उकळत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने नागपूरच्या MIDC पोलिसांनी ही कारवाई केली. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी पोलीस या बाबाच्या ठिकाणावर छापा मारायला गेले त्यावेळीही काही रुग्ण या बाबाकडे […]

Mumbaitak
follow google news

स्वतःला देवी आणि नागदेवतेचा अवतार सांगून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या ढोंगी बाबाला नागपूर पोलीसांनी अटक केली आहे. कोरोनामधून बरं करण्याचा दावा करुन हा ढोंगीबाबा रुग्णांकडून पैसे उकळत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने नागपूरच्या MIDC पोलिसांनी ही कारवाई केली.

हे वाचलं का?

महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी पोलीस या बाबाच्या ठिकाणावर छापा मारायला गेले त्यावेळीही काही रुग्ण या बाबाकडे उपचारासाठी आले होते. शुभम तायवाडे असं या ढोंगीबाबाचं नाव आहे. पोलीस या बाबाच्या ठिकाणावर पोहचताच शुभम ताळ्यावर आला. त्याने लागलीच पोलिसांची माफी मागत आपण कोणत्याही प्रकारचा उपचार करत नसल्याचं सांगितलं. यानंतर MIDC पोलिसांनी शुभमला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याच्यावर गुन्ह्याची नोंद केली आहे.

    follow whatsapp