वाघाची कातडी आणि नखं तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक

मुंबई तक

• 11:11 AM • 22 Apr 2021

भिवंडीत कोनगाव पोलिसांनी वाघाची कातडी आणि नखांची अवैध तस्करी केल्याच्या आरोपावरून चार जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींच्या दाव्यानुसार, कोकणातील ग्रामीण भागातून हे कातडी आणि नखांची तस्करी केली गेली होती. यानंतर मुंबईतील एका ग्राहकाला याची विक्री केली जाणार होती. पोलिसांच्या माहितीनुसार, 20 एप्रिल रोजी कोंगांव पोलिसांच्या पथकाला काही जण मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाकूर पाड्याजवळ बसुरी […]

Mumbaitak
follow google news

भिवंडीत कोनगाव पोलिसांनी वाघाची कातडी आणि नखांची अवैध तस्करी केल्याच्या आरोपावरून चार जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींच्या दाव्यानुसार, कोकणातील ग्रामीण भागातून हे कातडी आणि नखांची तस्करी केली गेली होती. यानंतर मुंबईतील एका ग्राहकाला याची विक्री केली जाणार होती.

हे वाचलं का?

पोलिसांच्या माहितीनुसार, 20 एप्रिल रोजी कोंगांव पोलिसांच्या पथकाला काही जण मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाकूर पाड्याजवळ बसुरी हॉटेलमध्ये आल्याची माहिती मिळाली होती. चार जणांकडे वाघाच्या कातडी आणि नखं असून अवैधरित्या विक्री करणार असल्याची माहिती होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील आणि पथकाने सापळा रचून या 4 जणांना अटक केली. छापेमारीनंतर वन्यजीव तज्ञांसह वाघाची कातडी आणि नखं ताब्यात घेण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, प्रशांत सिंग (वय 21), चेतन गौडा (वय 23), आर्यन कदम (वय 23) हे वडाळ्याजवळील भक्ती पार्क परिसरात राहतात. तर सायन कोळीवाडाच्या प्रितीक नगरमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय अनिकेत कदमचा यामध्ये समावेश आहे.

तपास अधिकारी अभिजीत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या अंतर्गत कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही चौघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केलं आणि 25 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावलीये.”

    follow whatsapp