अकोला : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील बंदोबस्त संपवून परत जाणाऱ्या पोलीसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. पातुर-बाळापूर मार्गावर बाभुळगावजवळ जीपचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. यात सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 पोलीस कर्मचारी व 3 होमगार्ड अशा सात जणांचा समावेश आहे. सर्व जखमींवर बाभुळगाव रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ADVERTISEMENT
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील 2 दिवसांपासून अकोला जिल्ह्याचे पोलीस 24 तास भारत जोडो यात्रेच्या बंदोबस्तात व्यस्त होते. काल (शुक्रवारी) दुपारी अकोला जिल्ह्यातून पातूर-वडेगाव-बाळापूरमार्गे यात्रा बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली. त्यानंतर सर्व पोलीस कर्मचारी आप आपल्या पोलीस स्टेशन येथे रवाना होण्यास सुरुवात झाली.
बंदोबस्त आटपून अकोला हेडकोर्टरचे वाहन क्रमांक MH 30 H 506 पातूरच्या दिशेने निघाले होती. या दरम्यान, गाडीचे टायर फुटल्याने चालक होमगार्ड संजय शिरसाठ यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी पलटी झाली. अपघात भीषण होता की 3 पलटी खाऊन गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली.
सुदैवाने या अपघातात जिवीत हानी झाली नाही. तर 7 जण जखमी झाले. पोलीस कर्मचारी सुनील सुखदेव वाघ, अश्वजित सरदार, उमेश सानप, कुंदन इंगळे, होमगार्ड गजानन घेघाटे, मोहोम्मद यासिर, वाहन चालक संजय शिरसाठ अशी जखमींची नावं आहेत. या सर्वांवर बाभुळगाव रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ADVERTISEMENT