बीड जिल्ह्यातील लव्हुरी येथील एका हॉटेलमधून उसतोड मुकादमाचं अपहरण करण्यात आलं होतं. या मुकादमाच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी त्याच्या मुलाजवळ १२ लाखांची खंडणी मागितली होती. अखेरीस या मुकादमाचं शीर धडापासून वेगळं करत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. सुधाकर चाळक असं या मुकादमाचं नाव असून त्याचं धड आरोपींनी हिरण्यकेशी नदीत फेकलं.
ADVERTISEMENT
यानंतर पुढे जाऊन १० किलोमीटर अंतरावर आरोपींनी चाळक यांच्या शीराची विल्हेवाट लावल्याचं समोर येतंय. केज पोलिसांचं पथक या घटनेचा तपास करत आहे.
सुधाकर उर्फ सुदाम चाळक हे महालक्ष्मी साखर कारखान्यात मजुर पुरवठा अधिकारी म्हणून कामाला होते. १६ फेब्रुवारीला त्यांचं काही अज्ञातांनी अपहरण केलं होतं. चाळक यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यावेळी २७ फेब्रुवारीला चाळक यांच्या मुलांना फोन करत अपहरणकर्त्यांनी १२ लाखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीसाठी धमकी देतानाची एक ऑडीओ क्लिप मध्यंतरी व्हायरल झाली होती ज्यात अपहरणकर्ते चाळक यांना मारहाण करताना ऐकायला येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे अपहरणकर्ते हिंदी भाषेत बोलत असून पैसे आणले नाहीतर तर चाळक यांना जीवे मारु अशी धमकीही त्यांनी मुलाला दिली.
बीडमध्ये अवैध धंद्यांना संदीप क्षीरसागर यांचं संरक्षण, शिवसेनेचा राष्ट्रवादीवर निशाणा
यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास अधिक वेगाने करायला सुरुवात केलं. कॉल रेकॉर्ड आणि अन्य माहितीच्या आधारावर पोलिसांनी तुकाराम मुंडे, रमेश मुंडे, दत्तात्रय देसाई या संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यापैकी दत्तात्रय देसाई यांनी गुन्हा कबुल करत चाळक यांचा शीर धडावेगळं करुन नदीत फेकल्याचं मान्य केलं. पोलिसांनी या प्रकरणात हिरण्यकेशी नदीपात्रात तपासणी केली असता त्यांना चाळक यांचा मृतदेह सापडला. अजुनही त्यांच्या शीराचा तपास सुरुच असल्याचं कळतंय. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून चाळक यांचा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास केला जात आहे.
मंदिरात दर्शन घेऊन येतो म्हणून घराबाहेर पडला, दोन दिवसांनी थेट मृतदेहच सापडला – बीडमधली घटना
ADVERTISEMENT