घरगुती भांडणातून पतीची तक्रार करायला गेलेल्या महिलेवर पोलीस ठाण्यातील हवालदारानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाईंदर पूर्व येथील नवघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस हवालदार बाळासाहेब ढोले याने हे कृत्य केल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय पीडित महिला घरात पतीसोबत वाद झाल्यानंतर त्याची तक्रार करण्यासाठी नवघर पोलीस ठाण्यात गेली होती. यावेळी आरोपी हवालदार बाळासाहेब ढोले याने पीडित महिलेला नवऱ्यासोबतचा वाद मिटवून देण्याचं आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपी हवालदाराने पीडित महिलेला धारावी मंदीर परिसरात नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पीडित महिलेने घडलेला प्रकार आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. नवघर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी हवालदाराला अटक केली आहे. दरम्यान कायद्याच्या रक्षकानेच भक्षकासारखं वागल्यामुळे सामान्य लोकांनी पोलिसांवर विश्वास ठेवायचा तरी कसा असा प्रश्न सध्या परिसरात विचारला जात आहे.
Satara Crime News : घराबाहेर झोपलेल्या तरुणाला अज्ञाताकडून गळा चिरुन खून
ADVERTISEMENT