धक्कादायक ! गाडी रस्त्यातून बाजूला घे सांगणाऱ्या पोलिसावर तलवारीने हल्ला

मुंबई तक

• 11:02 AM • 09 Feb 2022

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री साडेसात वाजल्याच्या सुमारास लक्ष्मी टाकळी भागात ही घटना घडली असून पोलीस कर्मचारी यात जखमी झाला आहे. लक्ष्मी टाकळी परिसरात जगदंबा नगर येथे एका रस्त्यावर पोलीस हवालदार स्वप्नील वाडदेकर हे आपल्या वाहनावरुन निघाले होते. यावेळी रस्त्यात एक स्कार्पिओ गाडी उभी […]

Mumbaitak
follow google news

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री साडेसात वाजल्याच्या सुमारास लक्ष्मी टाकळी भागात ही घटना घडली असून पोलीस कर्मचारी यात जखमी झाला आहे.

हे वाचलं का?

लक्ष्मी टाकळी परिसरात जगदंबा नगर येथे एका रस्त्यावर पोलीस हवालदार स्वप्नील वाडदेकर हे आपल्या वाहनावरुन निघाले होते. यावेळी रस्त्यात एक स्कार्पिओ गाडी उभी होती. हे वाहन बाजूला घेऊन रस्ता मोकळा करून द्या, असं वाडदेकर यांनी संबंधितास सांगितलं. इतक्यात एकाने तू मला सांगणार का म्हणत वाडेदकर यांना मारहाण सुरू केली.

इचलकरंजी : सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे यांचा निर्घृण खून

यानंतर दुसऱ्या व्यक्तीने येऊन तलवारीने वाडदेकर यांच्यावर वार केला. परंतु त्यांनी तो वार चुकवला. या झटापटीत वाडदेकर यांना दुखापत झाली. ज्यानंतर त्यांना उपचारसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पंढरपुर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम , पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली.

लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या भाऊ-बहिणीला चाकूचा धाक दाखवून लुटलं, आरोपी अटकेत

    follow whatsapp