शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, कुणाला कुठलं खातं मिळू शकतं?

मुंबई तक

• 10:52 AM • 07 Jul 2022

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. २१ जून रोजी जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं तेव्हाच सत्तांतर होणार हे स्पष्ट झालं होतं. घडलंही तसंच एकनाथ शिंदे यांच्यासह एक मोठा गट शिवसेनेच्या महाविकास आघाडीसोबतच्या भूमिकेवर नाराज होऊन बाहेर पडला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आता लवकरच या […]

Mumbaitak
follow google news

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. २१ जून रोजी जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं तेव्हाच सत्तांतर होणार हे स्पष्ट झालं होतं. घडलंही तसंच एकनाथ शिंदे यांच्यासह एक मोठा गट शिवसेनेच्या महाविकास आघाडीसोबतच्या भूमिकेवर नाराज होऊन बाहेर पडला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आता लवकरच या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यापैकी सर्वाधिक श्रीमंत कोण?

या मंत्रिमंडळात ४० आमदारांना काय मिळणार तसंच भाजपच्या वाट्याला काय येणार हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. एकनाथ शिंदेंसह एक मोठा गट जेव्हा शिवसेनेविरोधात बाहेर पडला. त्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. मात्र तसं घडलं नाही. आता शिंदे-फडणवीसांचं मंत्रिमंडळ कसं असेल याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे सभागृहात बरसले! मुख्यमंत्रीपदापासून ते संजय राऊतांपर्यंत घेतला समाचार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार

शिंदे गटातील आमदारांना ८ कॅबिनेट मंत्रिपदं तर ५ राज्यमंत्रिपदं मिळू सकतात. भाजपच्या वाट्याला २९ मंत्रिपदं येऊ शकतात.

शिंदे गटातील बंडखोर मंत्र्यांची पदं तिच असावीत ही इच्छा आहे. उद्धव ठाकरे सरकारने त्यांचे निर्णय रोखून ठेवले आहेत त्यामुळे सध्याचे खातेच कायम राहावे यासाठी शिंदे गटातले आमदार आग्रही आहेत. याचाच अर्थ शिंदे गटातले आमदार सध्याची खातं कायम राहावीत यासाठी उत्सुक आहेत हे स्पष्ट आहे.

भाजपच्या कोट्यातून अपक्ष आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला जावे अशी शिंदे कॅम्पची इच्छा असल्याचंही कळतं आहे. दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, उदय सामंत, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील येड्रावकर या सगळ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल ही शक्यता जास्त आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. बच्चू कडू यांना जे मंत्रिपद दिलं जाईल ते भाजपच्या कोट्यातून दिलं जावं असं शिंदे गटाचं म्हणणं असल्याचं कळतं आहे.

‘मातोश्री’वर कधी जाणार आहात?; काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

ही नवी नावं चर्चेत

दीपक केसरकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमुलकर, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं अशीही चर्चा आहे. एकनाथ शिंदे कँप म्हाडा किंवा सिडको यापैकी एक महामंडळ हवं आहे असंही कळतं आहे.

    follow whatsapp