– नितीन शिंदे, पंढरपूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात नुकत्याच नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत चांगलं यश मिळालं असलं तरीही भाजपने या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या. माळशिरसमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत सतरा पैकी दहा जागांवर विजय मिळवत भाजपने आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. परंतू याच तालुक्यात महाळुंग-श्रीपूर नगर पंचायतीत भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. मोहीते-पाटील गटाच्या ९ उमेदवारांनी इथे बाजी मारली असून या निवडणुकीदरम्यान लावण्यात आलेलं एक पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
महाळुंगमध्ये झालेला पराभव भाजप कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यातच मी ‘डी’ बोलतोय, भाजपला मतदान करायचे नाही, हे लक्षात ठेवा, अशी पोस्टर्स श्रीपूरमध्ये ठिकठिकाणी झळकली आहेत. त्यामुळे भाजपच्या विरोधात मतदान करायला सांगणारा हा ‘डी’ कोण? याचीच चर्चा या परिसरात रंगली असून भाजप मधील अंतर्गत गटबाजी या निमित्ताने पुढे आली आहे.
महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. त्या तुलनेत भाजपला चिन्हा वर फक्त एक जागा मिळाली आहे. दुसरीकडे इतर ९ जागा या मोहिते पाटील समर्थकांना मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्ष व मोहिते पाटील समर्थक असे दोन गट भाजपला मारक ठरतील, असं राजकीय विश्लेषकांचे मत होतं. त्याप्रमाणेच भाजपची अपक्ष उमेदवारांशी लढताना कमालीची दमछाक झाली. या साऱ्याचा परिणाम म्हणून भाजपला इथे केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत भाजपला फक्त १ जागा मिळणे व ‘डी’च्या नावाचे असे बॅनर लागणे व त्याच्या सांगण्यावरून तरी भाजपला मते दिली नसतील ना ? तर मग हा ‘डी’ कोण याचा भाजप या शोध घेणार का हा खरा प्रश्न आहे. हा ‘डी’ पक्षाशी संबंधित आहे की, पक्षाच्या बाहेरील आहे. तो पक्षाशी संबंधित असेल तर, पक्ष त्याच्यावर कारवाई करणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
माळशिरस निकाल –
-
भाजप -10
-
राष्ट्रवादी – 02
-
इतर – 05
म्हाळुंग श्रीपूर नागरपंचात निवडणुकीत मोहिते पाटील गटाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
-
एकुण जागा – 17
-
भाजप – 01
-
शिवसेना – 0
-
काँग्रेस – 01
-
राष्ट्रवादी – 06
-
इतर (अपक्ष) – 9 मोहिते-पाटील गट
ADVERTISEMENT