Thane : खोके-बोके ते लबाड बोके; पोस्टर वॉरमुळे तापलं ठाण्यातील राजकारण

मुंबई तक

30 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:10 AM)

NCP MLA Jitendra Awhad vs CM Eknath shinde : ठाणे : शहरात मागील काही दिवसांपासून बॅनरयुद्धाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे काही नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाल्यानंतर बॅनरबाजीच्या माध्यमातून आरोप, प्रत्यारोपांच्या राजकाणानं ठाण्याचं राजकारण तापलं आहे. मात्र यातील कोणत्याही बॅनरवर पक्षाचा किंवा चिन्हाचा उल्लेख नाही. त्यामुळे हे बॅनर नेमके कोणी लावले? […]

Mumbaitak
follow google news

NCP MLA Jitendra Awhad vs CM Eknath shinde :

हे वाचलं का?

ठाणे : शहरात मागील काही दिवसांपासून बॅनरयुद्धाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे काही नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाल्यानंतर बॅनरबाजीच्या माध्यमातून आरोप, प्रत्यारोपांच्या राजकाणानं ठाण्याचं राजकारण तापलं आहे. मात्र यातील कोणत्याही बॅनरवर पक्षाचा किंवा चिन्हाचा उल्लेख नाही. त्यामुळे हे बॅनर नेमके कोणी लावले? असा सवाल विचारला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जाणारे काही नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. अशात आव्हाडांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणि बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांचे फोटो लावले होते, यामुळे या चर्चांना जास्त हवा मिळाली.

Exclusive : Election Commission समोर शिंदे-ठाकरे गटाचे फायनल दावे!

नगरसेवकांच्या पक्षांतराची चर्चा सुरु झाल्यानंतर “खोका – बोका, नगरसेवकांनो स्वतःला विकू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात खोका नावाची किड महाराष्ट्राचे राजकीय संस्कार उध्वस्त करुन गेली. ही किड आता कळवा – मुंब्य्रात आली आहे. नगरसेवकांनो आता त्यांच्यापासून लांब रहा. कळवा – मुंब्य्रातील जनता तुमची गद्दारी कधीच माफ करणार नाही. २००९ नंतर कळवा – मुंब्य्रात झालेले बदल आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. गद्दारी जनता माफ करणार नाही”. असे मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले. त्याखाली रविंद्र पोखरकर एक जागरुक कळवेकर असं नाव लिहीण्यात आलं. यातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला डिवचत नगरसेवकांनी इतर पक्षात प्रवेश करू नये यासाठी आवाहन करण्यात आलं.

दरम्यान, या बॅनरच्या विरोधात कळवा उड्डाणपुलाच्या महामार्गावर काही बॅनर लागले. त्यात “लबाड बोका ढोंग करतोय, करुन करुन भागले नि प्रवचन झोडू लागले, नगरसेवक तुमचे तुमच्या हातातून चालले” अशा पद्धतीच्या चार चारोळ्या लिहीण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्या खाली ‘‘जनता आता समजून चुकली कोण खरे, कोण खोटे, नगरसेवकांनीही समजून घ्या आता माणूस किती आहे हा खोटा. तेल गेलं तूप गेलं धुपाटणंही राहणार नाही” असं देखील पुढे लिहीण्यात आलं आहे.

SRK on Pathaan : “मी वैतागलो होतो… इंडस्ट्री सोडून व्यवसाय करणार होतो”

दरम्यान, हे बॅनर कोणी लावले आणि कोणाच्या सांगण्यावरुन लावले हे जनतेला माहित आहे, असं म्हणतं बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के यावर प्रतिक्रिया दिली. तर नगरसेवकांना आवाहन करणारे बॅनर राष्ट्रवादीने लावले नव्हते, जो कोणी रवींद्र पोखरकर आहे त्याने लावले होते, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिलं. तर नगरसेवक गेले तर जाऊ देत अशी प्रतिक्रिया आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी दिली.

    follow whatsapp