मराठी सिनेसृष्टीत सध्या चर्चा सुरू आहे ती बोल्ड आणि हॉट वेब सीरिज रानबाजारची. रानबाजार या वेबसीरिजमध्ये प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित यांच्यासह अनेक दिग्गज मराठी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या वेबसीरिजचे दोन टिझर प्रदर्शित झाले आहेत. त्यातल्या एकामध्ये प्राजक्ता माळीचा बोल्ड अवतार समोर आला आहे. एवढंच नाही तर यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने केलेली पोस्टही चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे प्राजक्त माळीने?
प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न. माझ्यातल्या अभिनेत्रीवर विश्वास ठेवून माझ्या पदरी ही भूमिका टाकल्याबद्दल our captain of the ship @abhijitpanse व मराठीतील सगळ्यात मोठी web series बनवल्याबद्दल @planetmarathiott @akshaybardapurkar ह्यांचे आभार.
१८ तारखेलाला trailer येतोय, २० ला series येतेय…#रानबाजार
आतापर्यंत माझ्यावर आणि माझ्या कामांवर जसं प्रेम केलत, जो पाठिंबा दिलात; तसाच या ही web Series ला द्याल अशी आशा व्यक्त करते.
तुमचीच- प्राजक्ता
असं म्हणत प्राजक्ता माळीने ही पोस्ट केली आहे. प्राजक्ता माळीला आत्तापर्यंत आपण अनेक सोज्ज्वळ भूमिकांमध्ये पाहिलं आहे. मात्र या वेबसीरिजमध्ये तिचा बोल्ड अवतार समोर आला आहे. रेगे, ठाकरे असे सिनेमा देणारे अभिजित पानसरे यांनी ही वेबसीरिज दिग्दर्शित केली आहे. या सीरिजमध्ये मोहन आगाशे, सचिन खेडेकर, वैभव मांगले, उर्मिला कोठारे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्राजक्ता माळी यामध्ये एका शरीरविक्रय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत आहे. त्याचा टिझर आल्यानंतर प्राजक्ताला अनेकांनी ट्रोल केलं होतं. मात्र आता प्राजक्ताने एक पोस्ट लिहून सगळ्यांना उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT