ADVERTISEMENT
राष्ट्रपती रामनाथ कोविंद किल्ले रायगडला भेट देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रायगडास भेट देत असून, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
राष्ट्रपती दौऱ्यामुळे सध्या रायगडावर लगबग सुरू असून, राष्ट्रपतींच्या भेटी निमित्त सगळीकडे रेड कार्पेट अंथरण्यात आलं आहे.
डोळ्यात साठवून ठेवावा अशा पद्धतीने रायगडाची सजावट करण्यात आली आहे. लाल कार्पेट, फुलांबरोबर रोषणाईने रायगड उजळून निघाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज सदरेवरी आणि होळीच्या माळावरील पुतळ्याचीही सजावट करण्यात आली आहे.
रायगडकडे जाणाऱ्या महाड व माणगाव तालुक्याच्या प्रवेश रस्त्यांपासून पाचड परिसराला छावणीचे स्वरुप आलं आहे.
किल्ले रायगडाचं असंच विलोभनीय दृश्य मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांनाही कधीही बघायला मिळत नाही. त्याच्यासाठी कधीही किल्ला अशा पद्धतीने सजवला जात नाही, अशी खंतही आता काही शिवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT