रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यात खुनाच्या घटना वाढत असून पोलिसांचा वचक राहिला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात असून आज पुन्हा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे भर दुपारी पुजाऱ्याचा खून झाल्याची घटना घडली असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई शहरालगत असलेल्या शेपवाडी येथे हनुमान मंदिराचे पुजारी संतोष दासोपंत पाठक ( वय ५० , रा . रविवार पेठ , अंबाजोगाई ) यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला . ही घटना शनिवारी म्हणजेच आज दुपारी १ वाजता घडली आहे.
मनसेचे माजी कोरेगाव तालुका प्रमुख वैभव ढाणे यांची कोयत्याचे वार करून हत्या
संतोष पाठक यांच्याकडे शेपवाडी गावातील सर्व पूजाअर्चा असतात.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , आज गुढीपाडवा असल्याने ते सकाळपासून शेपवाडी गावातील हनुमान मंदिरात थांबले होते . दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर एका माथेफिरूने चाकूने अनेक वार केले . वार करतांना तेथे महिला उपस्थित होत्या काही महिलानी दगड मारुन पाठक यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते.ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या पाठक यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले , परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे .
पुणे : चिमुकलीवर बलात्कार करून खून; आरोपीला फाशी, एका वर्षातच न्यायालयाने दिला निकाल
सदरील तरुणांने खून का केला हे पोलीस तपासात उघड होईल.सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.पोलिसांचा वचक राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ADVERTISEMENT