BJP MLA Mahesh Landge threatened to kill : पिंपरी चिंचवड : भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात आरोपीने मेसेज करून 30 लाखांची खंडणी मागत ही धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ माजली आहे. (pune bhosari bjp mla mahesh landge death threaten and demand extortion)
ADVERTISEMENT
महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) यांनी भोसरी विधानसभा क्षेत्रातील नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी परिवर्तन हेल्पलाईन सुरु केली होती. नागरीक या हेल्पलाईन नंबरवर व्हाट्सअॅपवर आपली तक्रार पाठवायचे किंवा मदत मागायचे. त्यानंतर महेश लांडगे या हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरीकांच्या समस्या सोडवायचे.याच परिवर्तन हेल्पलाईनवरून आता महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या धमकीने शहरात एकच दहशतीचे वातावरण आहे.
निनावी फोनद्वारे धमकी
महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) नागरीकांसाठी चालवत असलेल्या परिवर्तन हेल्पलाईनच्या ( मोबाईल क्रमांकावर 30 लाखाची खंडणी दे, अन्यथा जीवाला धोका होईल, अशी धमकी देणारा मेसेज आला होता. या मेसेजमध्ये बँक खात्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच संबंधित बॅंकेत पैसे जमा करण्याच्या सूचना दिली होती. यासह इतर रक्कम एका गाडीतही ठेवण्यात आले होते.
हे ही वाचा : ‘बावन’ आणे, कमळबाई आणि शिंदेंचे शाप; शिवसेनेचा (UBT) भाजपवर घणाघात
या प्रकरणात इफ्तीकार शेख नावाच्या संशयीत व्यक्तीस नाव पोलिसांनी सांगितले आहे. तसेच खंडणीखोराविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.ज्या फोनवरून धमकीचा मेसेज आला होता, तो नंबर कोणाच्या नावावर रजिस्टर आहे? तसेच धमकी देणारा आरोपी नेमका कोण आहे? याचा पोलीस शोध घेत आहे.
दरम्यान याआधी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या मोबाईवर संपर्क साधून अज्ञाताने 30 लाख रूपयांची खंडणी मागितली होती. याबाबत बागवे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात देखील इफ्तीकार शेख नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आले होते. या प्रकरणात अधिकचा तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT