Pune : फिरायला गेलेल्या पती-पत्नी, मुलासह कार पानशेत धरणात बुडाली, महिलेचा मृत्यू

मुंबई तक

• 03:12 PM • 15 Aug 2021

पावसाळ्यात पर्यटनासाठी घराबाहेर पडलेल्या पुण्यातल्या देशपांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पानशेत धरणाजवळ कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात देशपांडे कुटुंबाची कार धरणात जाऊन पडली. या अपघातात समृद्धी देशपांडे यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती योगेश आणि मुलगा सुखरुप वाचले आहेत. रविवारी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान पुणे-कुरण-वेल्हे मार्गावर कादवे गावाजवळ हा अपघात घडला. या कारमध्ये तिघेजण […]

Mumbaitak
follow google news

पावसाळ्यात पर्यटनासाठी घराबाहेर पडलेल्या पुण्यातल्या देशपांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पानशेत धरणाजवळ कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात देशपांडे कुटुंबाची कार धरणात जाऊन पडली. या अपघातात समृद्धी देशपांडे यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती योगेश आणि मुलगा सुखरुप वाचले आहेत.

हे वाचलं का?

रविवारी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान पुणे-कुरण-वेल्हे मार्गावर कादवे गावाजवळ हा अपघात घडला. या कारमध्ये तिघेजण प्रवास करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देशपांडे कुटुंब, पुण्यावरुन पानशेत परिसरात फिरण्यासाठी आले होते. कुरण गावाच्या पुढे आल्यावर ते एका हॉटेलमधून नाश्ता घेतला आणि कार धरणाच्या शेजारी नेली. या परिवाराने नंतर कारमध्ये बसूनच नाश्ता केला.

दुपारी दोन वाजल्यानंतर देशपांडे कुटुंब कारमधून कादवे गावाच्या दिशेने निघाने. यावेळी पती योगेश हे कार चालवत होते आणि त्यांचा मुलगा शेजारी बसला होता. योगेश यांची पत्नी समृद्धी पाठीमागे बसल्या होत्या. धरणाच्या दिशेने जात असताना कारचा टायर अचानक फुटला, ज्यामुळे योगेश यांचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट धरणात जाऊन पडली. सुरुवातीला कार काहीकाळ पाण्यात तरंगत होती, पण नंतर पाणी आत शिरायला लागल्यानंतर कार धरणात बुडाली.

पुढच्या बाजूच्या दोन्ही काचा उघड्या असल्यामुळे योगेश आणि त्यांचा मुलगा बाहेर पडले. परंतू समृद्धी यांना बाहेर पडता आलं नाही. अपघाताचा आवाज ऐकल्यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एका व्यक्तीने दोरीच्या सहाय्याने पाण्यात उडी मारत समृद्धी यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतू यात त्यांना अपयश आलं. अखेरीस जॅकच्या सहाय्याने पाठीमागची काच फोडून समृद्धी यांना बाहेर काढण्यात आलं. अपघातानंतर समृद्धी यांना तात्काळ खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं, परंतू तोपर्यंत समृद्धी यांचा मृत्यू झाला होता.

    follow whatsapp