पुणे: पुण्यात काही लोकांनी शॉर्ट्स घातल्याच्या कारणावरून युवतींना चप्पलने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर पोलिसांनी याबाबत सांगितलं की हे प्रकरण खराडी येथील रक्षक नगर येथील आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवती या जवळच पेईंग गेस्ट म्हणून राहातात आणि वेगवेगळ्या कंपनीत काम करतात. दरम्यान, पेईंग गेस्टच्या ज्या मालकीण आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, काही लोकांनी त्यांच्या येथे पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या महिलांना मारहाण केली.
दरम्यान, तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी 6 जणांविरुद्ध भादंवि कलम 448, 323, 504, 506, 143, 147, 149 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
चप्पलने मारहाण करून घर फोडण्याची धमकी दिली
एका एजन्सीच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार महिलेने सांगितले की, हे लोक अनेकदा त्यांच्याशी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडतात. यावेळी त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या महिलांच्या कपड्यांवरुन त्यांना मारहाण केली.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री काही लोक त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या पीजीमध्ये राहणाऱ्या महिला शॉर्ट्स घालून परिसरात फिरत असल्याच्या कारणावरून भांडण करू लागले. वाद एवढा वाढला की त्यांनी प्रथम पीजीमध्ये राहणाऱ्या मुलींना चप्पलने मारहाण केली आणि नंतर घर तोडून टाकण्याची धमकीही दिली.
अनैतिक संबंधाच्या संशयावरून महिलेला अर्धनग्न करुन तुफान मारहाण, Video व्हायरल
गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सिंधू सानप असं वनरक्षक महिला कर्मचाऱ्याचं नाव असून, रामचंद्र जानकर असं मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाचं नाव आहे. यावेळी माजी सरपंचाच्या पत्नीने सिंधू सानप यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना चप्पलेनं मारहाण केली होती.
साताऱ्यात पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. वनरक्षक महिला कर्मचारी सिंधू सानप या 3 महिन्यांची गर्भवती असून, त्यांच्या पोटात लाथा आल्याचा आरोप सरपंचावर करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या डोक्यात दगड देखील मारल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT