MPSC : परीक्षार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; CM शिंदेंची आयोगाला विनंती

ऋत्विक भालेकर

31 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:10 AM)

Pune MPSC students agitation मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी UPSC च्या धर्तीवर MPSC चा नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीला तत्वतः मान्यता दिली आहे. तसंच मुख्यमंत्री शिंदे आता आयोगालाही याबाबत विनंती करणार आहेत. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता […]

Mumbaitak
follow google news

Pune MPSC students agitation

हे वाचलं का?

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी UPSC च्या धर्तीवर MPSC चा नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीला तत्वतः मान्यता दिली आहे. तसंच मुख्यमंत्री शिंदे आता आयोगालाही याबाबत विनंती करणार आहेत. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. (Chief Minister Eknath Shinde approval of the demand to implement the new syllabus of MPSC from 2025)

मंगळवारी (३१ जानेवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यात MPSC परीक्षार्थ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर इतर मंत्र्यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना यासंदर्भात अवगत केले आणि हे नियम २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली. यानंतर मुख्यमंत्र्यांकडून तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आहे. आता राज्य सरकारतर्फे MPSC ला विनंती करण्यात येणार आहे.

Anil Parab Vs Kirit Somaiya : संघर्ष पेटला! म्हाडा कार्यालयाबाहेर ठिय्या

या निर्णयामुळे यावर्षीची आणि २०२४ मधील परीक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसारच होणार आहे. यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला असून सरकारचे आभार मानले आहेत. तसंच आता आंदोलनही मागे घेण्यात आलं आहे.

UPSC च्या धर्तीवर MPSC चा नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो २०२५ पासून लागू करावा अशी मागणी करत पुण्यात परीक्षार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. अलका टॉकीज चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आलं होतं. यापूर्वी १३ जानेवारीलाही परीक्षार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर आज परीक्षार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले होते. तब्बल चार वेळा आंदोलन केल्यानंतर अखेरीस मागणी मान्य झाल्याने परीक्षार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

MPSC : आता तृतीयपंथीयांनाही पोलीस भरतीत संधी; सरकारनं हायकोर्टात दाखवली तयारी

दरम्यान, यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. यावेळी परीक्षर्थ्यांनी दोन्ही आमदारांनी डोक्यावर घेऊन पुण्यात मिरवणूक काढली. गोपीचंद पडळकर बोलताना म्हणाले, हे विद्यार्थ्याचं यश आहे. भाजपच संवेदनशील सरकार असल्यानं निर्णय झाला. अन्य राजकीय नेत्यांना यायचं असतं तर आंदोलनात त्यांना सुद्धा श्रेय मिळाले असते.

    follow whatsapp