Pune : ‘पत्नीचा पायगुण चांगला नाही, तिला सोडून दे’, सल्ला देणाऱ्या प्रतिष्ठीत राजकीय गुरुला अटक

मुंबई तक

• 04:19 AM • 12 Jul 2021

तुझ्या पत्नीचा पायगुण चांगला नाही, तिला सोडून दे. यासाठी अनेक विधी करावे लागतील असा सल्ला देणाऱ्या पुण्यातील प्रतिष्ठीत राजकीय गुरु रघुनाथ येमुलला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. येमुलच्या सल्ल्यावरुन पती आपल्या पत्नीला मारहाण करायचा. याप्रकरणी पोलिसांनी पती गणेश गायकवाड याच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला ही एका उच्चशिक्षीत […]

Mumbaitak
follow google news

तुझ्या पत्नीचा पायगुण चांगला नाही, तिला सोडून दे. यासाठी अनेक विधी करावे लागतील असा सल्ला देणाऱ्या पुण्यातील प्रतिष्ठीत राजकीय गुरु रघुनाथ येमुलला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. येमुलच्या सल्ल्यावरुन पती आपल्या पत्नीला मारहाण करायचा. याप्रकरणी पोलिसांनी पती गणेश गायकवाड याच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला ही एका उच्चशिक्षीत कुटुंबातील आहे. २३ जानेवारी २०१७ पासून महिलेचे पती गणेश गायकवाड तिला सिगरेटचे चटके देत होता. पत्नीला बहिरेपणा येईपर्यंत पती गणेश गायकवाड यांनी मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादी पीडित महिलेने मागील महिन्यात पतीसह आठ जणांविरोधात तक्रार दाखल केली. यानुसार सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेचा पती गणेश गायकवाड हा सध्या फरार आहे. येमुलला आपला गुरु मानलेल्या गणेश गायकवाडने त्याच्या सल्ल्याने आपल्या पत्नीचा छळ करायला सुरुवात केली होती. “तुझ्या पत्नीचा पायगुण चांगला नाही, तिला सोडून दे, जर तुझी ही बायको म्हणून अशी कायम राहीली तर तु आमदार होणार नाही आणि मंत्री होणार नाहीस. त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे, आणि तुझा मुलगा तिच्या काढुन घे, मी देतो ते लिंबु उतरविल्यावर, तुझ्या मागची पिडी कायमची निघुन जाईल”, असा सल्ला येमुलने आपल्या पतीला दिल्याची तक्रार महिलेने केली होती. ज्यावरुन पोलिसांनी रघुनाथ येमुलला अटक केली आहे. या प्रकरणात इतर सहा आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळवला असून पोलीस महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत.

    follow whatsapp