TET Exam Scam : अबब…! आश्विन कुमारच्या घरातून २५ किलो चांदी, २ किलो सोनं जप्त

मुंबई तक

• 10:13 AM • 25 Dec 2021

राज्यात गेल्या काही दिवसांपासून TET परीक्षेचा घोटाळा आणि त्यानंतर झालेलं अटकसत्र चांगलंच गाजत आहे. या घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार तुकाराम सुपेने विविध ठिकाणी लपवलेली रोकड पुणे पोलिसांना आतापर्यंत जप्त केली आहे. यानंतर G A सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आश्विन कुमारच्या घरातूनही पोलिसांना मोठं घबाड होती लागलेली आहे. आश्विन कुमारच्या घरातून पुणे पोलिसांनी २५ किलो चांदी आणि […]

Mumbaitak
follow google news

राज्यात गेल्या काही दिवसांपासून TET परीक्षेचा घोटाळा आणि त्यानंतर झालेलं अटकसत्र चांगलंच गाजत आहे. या घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार तुकाराम सुपेने विविध ठिकाणी लपवलेली रोकड पुणे पोलिसांना आतापर्यंत जप्त केली आहे. यानंतर G A सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आश्विन कुमारच्या घरातूनही पोलिसांना मोठं घबाड होती लागलेली आहे.

हे वाचलं का?

आश्विन कुमारच्या घरातून पुणे पोलिसांनी २५ किलो चांदी आणि दोन किलो सोनं असा मुद्देमाल जप्त केला आहे.

हा माल हस्तगत केल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज येऊ शकतो. आतापर्यंत पोलिसांनी सुपेकडून ३ कोटींच्या घरात मुद्देमाल जप्त केला आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी आश्विन कुमारला याआधीच अटक केली आहे. आश्विन कुमार हा प्रीतिश देशमुखसोबत काम करत होता.

प्रीतिशकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आजी-माजी आयुक्तांना या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर याचे धागेदोरे थेट बंगलोर येथील अश्विनकुमारपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यानंतर पोलिसांचे एक पथक शुक्रवारी त्याच्या बंगलोर येथील निवासस्थानी पोहोचले. या ठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी हिरे, सोनं, चांदी असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

TET गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आणि परीक्षा परिषेदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांनी जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख यांच्याशी हातमिळवणी केली. त्यांनी बनावट वेबसाईट तयार करून अपात्र उमेदवारांचे निकाल जाहीर करत पैसे उकळले, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.न्यायालयाने दोघांची पोलीस कोठडी ३० डिसेंबरपर्यंत वाढवली.

    follow whatsapp