पंजाब विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या अकाली दलाला धोबीपछाड देत आम आदमी पक्षाने सत्तेच्या दिशेने कूच केलं आहे. भगवंत मान यांच्या रुपाने आम आदमी पक्षाला दिल्लीच्या बाहेर पहिलाच मुख्यमंत्री मिळाला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज मतदारांना पराभव स्विकारावा लागला. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धु, अकाली दलाचे विक्रमजीतसिंह मजिठीया या बाहुलबलींना पराभूत अमृतसर पूर्व मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या जीवनज्योत कौर विजयी ठरल्या आहेत.
ADVERTISEMENT
निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार, जीवनज्योत कौर यांना 39 हजार 679, मजिठीया यांना 25 हजार 188 तर सिद्धु यांना 32 हजार 929 मतं मिळाली आहेत.
एकीकडे प्रचारादरम्यान सिद्धु आणि मजिठीया यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असताना जीवनज्योत कौर यांनी आपल्या श्री हेमकुंत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. जीवनज्योत कौर या EcoShe Menstrual Health Programme शी संलग्न झाल्या आहेत. कारागृहातील महिला कैदी, शाळा, झोपडपट्टीतील वस्ती आणि ग्रामीण भागात इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन वाटत या महिलांना याचे फायदे समजावून सांगण्यात त्या आघाडीवर असतात. त्यांच्या या कामामुळे जीवनज्योत यांना अमृतसरमध्ये पॅड वूमन ही उपाधी मिळाली आहे.
मोबाईल रिपेअरिंगचं दुकान, बसमधून प्रवास करत प्रचार, कोण आहेत चन्नींना हरवणारे लभ सिंग?
जीवनज्योत कौर यांनी 2015 साली आम आदमी पक्ष जॉईन केला. 2013 साली अरविंद केजरीवाल यांनी माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा पराभव केल्यामुळे प्रेरित झालेल्या जीवनज्योत यांनी आम आदमी पक्षाची वाट धरली. एकीकडे मजिठीया आणि सिद्धु प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप व्यस्त असताना जीवनज्योत कौर यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी आणि वॉर्ड लेवल बैठकांवर भर दिला. अमृतसरमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी, उघडी गटारं, रहिवासी वस्त्यांमध्ये उघड्यावर पडलेल्या विजेच्या तारा, मुलांमध्ये असलेली ड्रग्जची सवय असे अनेक मुद्दे ऐरणीवर आहेत.
वाळपोई विश्वजीत राणेंचीच! कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत
परंतू यंदाच्या निवडणुकीत सिद्धु आणि मजिठीया यांच्या लढाईत या मुद्द्यांकडे दोन्ही पक्षांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं जीवनज्योत कौर म्हणाल्या. यावेळी दोन्ही उमेदवारांनी जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांकडे जराही लक्ष दिलं नाही. ज्याचा फायदा जीवनज्योत यांना झाला. जीवनज्योत यांना दोन मुलं असून एक वकील असून दुसरा मुलगा डेन्टीस्ट आहे. आतापर्यंत जीवनज्योत यांनी केलेल्या मेहनतीचं त्यांना फळ मिळाल्याचं बोललं जातंय.
ADVERTISEMENT